मुळा रस्ता, खडकी - राज्य सरकारतर्फे बांधून देण्यात आलेल्या घराचे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना रविवारी हस्तांतर करण्यात आले. या वेळी रामदास आठवले व इतर मान्यवर.
मुळा रस्ता, खडकी - राज्य सरकारतर्फे बांधून देण्यात आलेल्या घराचे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना रविवारी हस्तांतर करण्यात आले. या वेळी रामदास आठवले व इतर मान्यवर. 
पुणे

साहित्यिक उत्तम तुपे यांना हक्काचे घर

सकाळ वृत्तसेवा

खडकी - ‘मातंग समाजाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. त्यामुळे समाजातील मुलांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल. अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ केली जाईल,’’असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुळा रोड येथे घर बांधून दिले आहे. त्यांच्या हस्तांतरप्रसंगी रविवारी आठवले बोलत होते. तुपे यांच्या घराच्या दुरवस्थेवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर त्याची दखल सरकारसह समाजातील विविध स्तरांतून घेण्यात आली.  

हस्तांतरप्रसंगी आमदार विजय काळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सोनाली लांडगे, आदित्य माळवे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या शिल्पाचे अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले. मातंग व बौद्ध समाजाने विकासासाठी एकत्र येण्याची गरज असून, वेगळ्या आरक्षणासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT