Lohagad Fort Sakal
पुणे

Pune : लोहगडावर पर्यटकांची गर्दी! लोकं 4 तास महादरवाज्यात अडकले; Video होतोय Viral

लोहगडावर जाण्याआधी हा व्हिडिओ पाहा, रविवार असल्यामुळे झाली गर्दी

दत्ता लवांडे

पुणे : पुणे शहरापासून जवळपास ७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर काल रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. किल्ल्याच्या महादरवाजामध्ये जवळपास ४ तास लोकं अडकून पडल्याची माहिती असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, काल रविवार असल्यामुळे पुणे, लोणावळा येथून आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक पर्यटक लोहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येत असतात. हा किल्ला मान्सूनमध्ये पर्यटकांना खुणावत असतो. तर मान्सून सुरू झाल्यानंतर पर्यटकांनी काल या किल्ल्यावर गर्दी केली होती.

दरम्यान, हजारो पर्यटक किल्ल्यावर अडकले असून त्यांना चार तास एकाच जागेवर उभा रहावं लागलं आहे. तर यासंदर्भातील अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पर्यटकांनी विकेंडला या किल्ल्यावर फिरायला येऊ नका असं अवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यापासून जवळ असलेल्या पर्यटन स्थळावर शनिवार आणि रविवार या दिवशी कायम गर्दी असते. मान्सून सीझनमध्ये अनेक पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होत असते त्यामुळे विकेंडच्या दिवशी फिरायला जाताना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT