पुणे

माहेरहून पैसे आणण्यासाठी मरकळला विवाहितेचा छळ

CD

लोहगाव, ता. २६ : माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंदेविरोधात लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पती आणि सासू-सासऱ्याच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (ता. २) वाढ केली आहे.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर २३ फेब्रुवारीला आरोपी स्वतःहून लोहगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी पती आदित्य अनिल लोखंडे (वय २८), सासरे अनिल किसन लोखंडे (वय ५३), सासू सुवर्णा (वय ४८, सर्वजण, रा. मरकळ, ता. खेड) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लग्नात दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याशिवाय ५५ तोळे सोने, दोन किलो चांदी आणि आलिशान मोटार दिल्यानंतरही पतीचे दोन कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात येत होता. सतत शिवीगाळ आणि मारहाण करून अत्याचार करण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे करत तपास आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT