girish mahajan sdakal
पुणे

Loksabha Elections : बारामतीसह सर्व जागांवर भाजपच बाजी मारणार- गिरीश महाजन

यंदा आमच्यासोबत अजितदादा पवार व त्यांच्यासोबतचे आमदारही आहेत त्या मुळे बारामतीची जागा आम्ही जिंकू.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजप राज्यातील बारामतीसह सर्व 48 जागा जिंकणार असून देशाचे आगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील असा विश्वास ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. चौंडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून तेथे भेट देण्यासाठी गिरीश महाजन निघाले होते. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मित्रपक्षांसह राज्यात लोकसभेसाठी निर्विवाद यश प्राप्त करु अशी ग्वाही दिली. विरोधक या बाबत क्लिन बोल्ड होतील, असे ते म्हणाले.

यंदा आमच्यासोबत अजितदादा पवार व त्यांच्यासोबतचे आमदारही आहेत त्या मुळे बारामतीची जागा आम्ही जिंकू. मी गेल्या तीस वर्षांपासून आमदार आहे, मी कायम खऱच बोलतो, कदाचित बारामतीकरांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही पण बारामतीसह राज्यातील सर्व जागा भाजप जिंकणार असून मोदीच पंतप्रधान होणार अशी खात्री त्यांनी दिली.

गिरीश महाजन म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक झालेली आहे, त्यात सकारात्मक मार्ग निघालेला असून आज उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, यातून निश्चित सकारात्मक मार्ग निघेल व उपोषण संपेल.

पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून अन्याय होतो ही ओरड विरोधकांची आहे, राष्ट्रवादी व उध्दव ठाकरे यांच्याकडे कोणी थांबायला तयार नाही, त्यांनी त्यांचे पक्ष नीट सांभाळावेत, पंकजा मुंडे आमच्यासोबतच आहेत, त्या मुळे त्याची काळजी इतरांनी करु नये,

मराठा आरक्षणाबाबतही निश्चित योग्य तोडगा निघेल, समिती स्थापन झालेली असून अभ्यास सुरु आहे, चाळीस दिवसांची मुदत या बाबत देण्यात आलेली आहे, सरकार निश्चित काहीतरी चांगला मार्ग काढेल, असेही महाजन म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दांचा विपर्यास केला गेला, देवेंद्र फडणवीस यांनीही या बाबत खुलासा केलेला असल्याने हा विषय फार ताणू नये, असे महाजन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT