Narendra Modi Sharad Pawar sakal
पुणे

Lokmanya Tilak Award: पुण्यात मोदी, पवार एकाच मंचावर येणार! PM मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त ठरलंय यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. हे पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. (Lokmanya Tilak Award announced to PM Modi presence of Sharad Pawar also on same stage in Pune)

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी अर्थात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरणं केलं जातं. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मोदी उपस्थितीत राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते शरद पवार यांना देखील या पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT