Shivajirao-Adhalrao-Patil
Shivajirao-Adhalrao-Patil 
पुणे

Loksabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकांचे माझ्यावर खापर - आढळराव

सकाळवृत्तसेवा

चाकण - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात या वेळी विजयाचा चौकार मारणार आहे. मतदारसंघात जनतेचा संपर्क मोठा असल्याने जनताच मला विजयी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात काहीच केले नाही. त्यांच्या चुकांचे खापर माझ्यावर फोडून माझ्यावर टिका करणे योग्य नाही. जनता हे सर्व जाणते आहे,’’ अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी महाळुंगे (ता. खेड) येथे महायुतीच्या वतीने जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुरेश गोरे, अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, किरण मांजरे, रामदास धनवटे, विनोद महाळुंगकर उपस्थित होते. 

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘पुणे- नाशिक रेल्वेला केंद्रात भाजपचे सरकार असताना हिरवा कंदील मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी पुणे- नाशिक रेल्वेसाठी काहीच केले नाही. माझ्या पाठपुराव्यामुळे रेल्वेचे काम मार्गी लागत आहे. पुणे- नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे कामही बहुतांश प्रमाणात झाले आहे. नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याचे कामही मार्गी लागणार आहे. यासाठी माझा सतत पाठपुरावा आहे. मुख्य शहरांची बाह्यवळणांची कामेही होणार आहे. पण, विरोधक टीका करताना वाहतूक कोंडीवर बोलतात. त्यांनी सत्तेत असताना काय केले? हा माझा सवाल आहे. चाकणला दोन बिनकामाचे पूल केले, हे त्यांचे पाप आहे. बैलगाडा शर्यती त्यांचे सरकार असताना बंद पडल्या, हेदेखील त्यांचे पाप आहे. त्याचे खापर खासदारांवर फोडणे चुकीचे आहे.’’ 
या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी खेड तालुक्‍यातून खासदार आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्‍क्‍य मिळणार आहे. खासदारांचा जनसंपर्क असल्याने जनता त्यांनाच निवडून देणार आहे.

आढळराव पाटील यांचा वाघजाईनगर, खराबवाडी, कान्हेवाडी, सांगुर्डी, येलवाडी, खालुंब्रे या गावांत प्रचार दौरा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT