prakash ambedkar asaduddin owaisi
prakash ambedkar asaduddin owaisi 
पुणे

Loksabha 2019 : प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांची रविवारी दुपारी सभा

सकाळवृत्तसेवा

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुदुद्दीन ओवेसी यांची रविवारी (ता. २१) जाहीर सभा होणार आहे. एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर दुपारी दोन वाजता सभा होईल.  

आघाडीचे समन्वयक लक्ष्मण माने, हरिदास बधे, राजाराम पाटील यांच्यासह आघाडीतील विविध पक्ष संघटनांचे नेते, पदाधिकारी  उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उमेदवार जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, एमआयएमचे शहराध्यक्ष लियाकत शेख, कोशाध्यक्ष संजय सोनेकर उपस्थित होते. शहराचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने उकाडा वाढला आहे. या रणरणत्या उन्हात ही सभा होणार आहे. सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. 

रविवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या सभेद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आघाडीचा आहे. तसेच भर उन्हात नागरिक सभेला येणार की नाही, हादेखील प्रश्‍न आहे. 

जाधव यांच्या प्रचारासाठी होत असलेली ही पहिली आणि अखेरची सभा आहे. त्यामुळे आंबेडकर आणि ओवेसी सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT