lonikand police action 48 hours accused arrest who killed friend pune crime marathi news Sakal
पुणे

Pune Crime : लोणीकंद पोलिसांनी करुन दाखवलं! 48 तासात मित्राचा खून करणार्यांना केले अटक

कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून करणार्यां दोघांना लोणीकंद पोलीसानी 48 तासाच्या आत जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून करणार्यां दोघांना लोणीकंद पोलीसानी 48 तासाच्या आत जेरबंद केले. वाघोलीतील केसनंद रोडवरील सिट्रॉन सोसायटी समोर समोरील लेबर कॅम्प मध्ये ही घटना घडली होती.

शैलेंद्र मंडगीकर याचा खून झाला होता. या प्रकरणी राम सुभाष श्रीरामे ( वय 22, मूळ रा नांदेड ) याला तुळजापूर येथून तर त्याचा मित्र गोपाल कोतलापुरे ( वय 26, मूळ रा नांदेड ) याला वाघोलीतील चोखीधानी परिसरातून अटक करण्यात आली.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामे, मंडगीकर व कोटलापुरे दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणे झाली. दोघांनी शैलेंद्र याचा खून केला. त्यानंतर ते पळून गेले. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलीसानी त्यांच्या शोधार्थ दोन पथके तयार केली.

श्रीरामे तुळजापूर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे पोहचले. तेथे त्याला अटक करण्यात आली. तर कोतलापुरे हा पुन्हा वाघोलीत येणार असल्याची माहिती कर्मचारी रितेश काळे यांना मिळाली.

त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील,

सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, गजानन जाधव, शिरीष भालेराव, सोमनाथ पडसळकर, निखिल पवार, उपनिरीक्षक राहुल कोळपे, सुरज गोरे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, स्वप्नील जाधव, रितेश काळे, विनायक साळवे, सागर जगताप, मल्हारी सपुरे यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT