SYSTEM
पुणे

आठवड्यात श्वानाचे 5 किलो वजन कमी;देशात पहिलीच शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वजन कमी करण्यासाठी माणसांवर बॅरियट्रिक ही जीवरक्षक शस्त्रक्रिया करतात, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालं असेलच. पण, अशीच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया एका श्वानावर पुण्यात करण्यात आली; आणि आश्चर्य म्हणजे तिचं वजन एका आठवड्यात चक्क पाच किलोने कमी झालं.(Lose 5 kg of dog weight in week after surgery first time in the country in Pune)

लठ्ठपणा हा आजार असून माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्येही वाढतोय. श्वानाचे वजन कमी करण्यासाठी ‘लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टॉमी’ची देशातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. पुण्यातील कर्वेनगर येथे राहणाऱ्या यास्मीन दारूवाला यांनी दीपिका ही कुत्री पाच वर्षांपासून पाळली आहे. सुरवातीला ती घराच्या परिसरात इकडून-तिकडे पाळायची. गेल्या काही महिन्यांपासून श्वास घेताना तिला त्रास जाणवू लागला. ती एकाच जागी बसून राहायची. औषधोपचाराने तिची प्रकृती काही सुधारत नव्हती. त्यामुळे दारूवाला यांनी ‘स्मॉल अॅपनिमल क्लिनिक’चे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र परदेशी यांचा सल्ला घेतला. त्यांनी दीपिकाचे अतिरिक्त वजन कमी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी आहारात बदल करून ‘लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ शस्त्रक्रियेचा सल्लाही दिला. त्यानंतर पुण्यातील लॅपरो ओबेसो सेंटरचे संचालक आणि बॅरियाट्रिक शल्यचिकित्सक डॉ. शशांक शहा यांच्या मदतीने दीपिकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. शाह म्हणाले की, ‘‘माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही लठ्ठपणा हा आजार वाढतोय. देशात अनेक लठ्ठ पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, बॉक्सर, सेंट बर्नार्ड या भारतीय कुत्र्यांच्या प्रजाती असून त्यांना कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ जास्त प्रमाणात दिला जातो. या श्वानाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती.’’

डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘लठ्ठपणामुळे श्वानांचे सांधे कमकुवत होत असल्याने शारीरिक हालचाल मंदावते. या श्वानाच्या शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी वैद्याकीय चाचण्या करण्यात आल्या. शरीरातील चरबीनुसार श्वानाच्या आहारात बदलत करण्यात आला. याशिवाय औषधोपचाराद्वारे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण त्याचा श्वानावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करावी लागली.’’

शस्त्रक्रिया करताना...

श्वानाला भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेपूर्वी बारा तास श्वानाला द्रव आहाराशिवाय काहीही दिले नाही. साधारणतः प्रत्येक श्वानाचे वजन १८ ते २० किलो असले पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल ५० किलो एवढे होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे.

''माणसांप्रमाणे या कुत्र्याला लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांध्यांचे विकार होते. श्वानाचे सरासरी आयुर्मान हे १२ ते १५ वर्ष असते. परंतु, लठ्ठपणामुळे श्वानाचे आयुष्य सहा वर्षांनी कमी झाले आहे.''

- डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन, लॅपरो ओबेसो सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT