कात्रज : पीएमपीच्या कात्रज आगारातून ग्रामीण भागात नव्याने सुरु झालेल्या बसमामार्गांमुळे पीएमपीला तोटा होत असल्याचे दिसून येत आहे. कात्रज डेपोतून कात्रज ते सारोळा, सासवड मार्गे बोपदेवनगर, रहाटवडे, केतकावळे, विंझर आणि वांगणीवाडी या सहा मार्गांवर बससेवा सुरु आहेत.
यापैकी बस मार्ग क्रमांक ६१ कात्रज ते सारोळा मार्गांवरील चार फेऱ्या तर बसमार्ग क्रमांक २९३ कात्रज ते सासवड मार्गे केतकावळे या मार्गांवरील एक फेरी प्रतिसाद कमी असल्याने बंद करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात आणि राष्ट्रीय परिवहन खात्याच्या (एसटी) बसेस बंद असताना या मार्गांवरील बससेवांना चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, त्यानंतर तुलनेने प्रतिसाद कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणांवर शहरात ये-जा करत असतात.
दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावर दैनंदिन किंवा मासिक पासची सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे बसेसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असली तरी त्यामुळे पीएमपीला तोटा सहन करावा लागत आहे. प्रति किलोमीटरप्रमाणे पीएमपीची सरासरी मिळकत ही ४५ रुपये तर प्रति किलोमीटरला येणारा सरासरी खर्च हा ९० रुपयांच्या जवळपास आहे. मात्र, ग्रामीण भागातील एकाही मार्गांवरील पीएमपीचे प्रति किमीला मिळणारे उत्पन्न एका बसमार्गाचे ४५ रुपयांच्या पुढे नाही.
मार्ग क्रमांक-मार्ग-मार्गाचे अंतर-ईपीके(प्रतिकिमी उत्पन्न)
६१-कात्रज ते सारोळा-३८किमी-३१.९९रुपये
२०९-कात्रज ते सासवड मार्गे बोपदेवनगर-२६.८०किमी-३८.६८रुपये
२९२-कात्रज ते कोंढणपूर, कल्याण,रहाटवडे-२९.९०किमी-२७.२९रुपये
२९३-कात्रज ते सासवड मार्गे केतकावळे-५२.१०किमी-२३.४०रुपये
२९६-कात्रज ते विंझर-४६.५०-३३.८५रुपये
२९६अ-कात्रज ते वांगणीवाडी-४४किमी-४२.३९
ग्रामीण भागशी संपर्क करण्यासाठी या बससेवा महत्वाच्या आहेत. विद्यार्थी, कामगारवर्ग हा मोठ्या प्रमाणांवर ग्रामीण भागांतून शहरात ये-जा करत असतो. तो शहराशी जोडण्यासाठी पीएपीच्या बसेस हा महत्वाचा दुवा आहेत. त्यामुळे फायदा तोट्याचा विचार न करता या बससेवा सुरु ठेवणे महत्वाचे आहे. या धर्तीवर प्रवाशांना पीएमपीकडून उत्तम सेवा दिली जात आहे.
- गोविंद हांडे, आगार व्यवस्थापक, कात्रज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.