पुणे

निकृष्ट अन्न आणि खोट्या सह्या...

संतोष शाळिग्राम

पुणे : "हो, मी माजी सैनिकांच्या मुलांना शिवीगाळ केली,' अशी कबुलीच माजी सैनिक मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक गोविंद साळुंखे यांनी निलाजरेपणाने चौकशी समितीसमोर दिली आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न देण्याबरोबरच सुटीवर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या हजेरी पुस्तकांवर खोट्या सह्या करून घेतल्या जात असल्याचे चौकशीमुळे उजेडात आले आहे. 

वसतिगृहातील गैरप्रकार आणि तेथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अत्याचारास "सकाळ'ने "शिवीगाळ, अत्याचार आणि धमक्‍या' या वृत्ताने वाचा फोडली. सरकारी स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या पुण्यातील वसतिगृहातून साळुंखे यांची पाच वर्षे बदलीच झालेली नाही. या काळात त्यांनी गैरप्रकार करून अत्याचार केल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्याची चौकशी झाली, त्यात समितीलाही अनेक गैरप्रकार आढळून आले आहेत.

विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रतीचे अन्न दिले जात असून, आहाराच्या सूचीमध्ये फळ देणे बंधनकारक असतानाही ती दिली जात नाहीत. वसतिगृहाचा परिसर, स्नानगृह आणि शौचालय यांची स्वच्छता होत नसल्याचे समितीने म्हटले आहे. एवढेच नाही, तर स्वयंपाक घर आणि भोजनगृहात झुरळे फिरतात, हेदेखील साळुंखे यांनी मान्य केले आहे.

तसेच, औषध फवारणीची नोंदवहीदेखील समितीला तपासणीसाठी उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे याबाबतही समितीने संदिग्धता असल्याचे ताशेरे ओढले आहेत. यामुळे वसतिगृहाच्या देखरेखीसाठी आलेला पैसा जातो कुठे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

साठ रुपयांसाठी... 

वसतिगृहातील विद्यार्थी सुटीवर गेल्यानंतर हजेरी पुस्तकात त्याच्या नावापुढे लाल शाईच्या पेनाने एल (रजा) लिहिण्याची पद्धत आहे. परंतु, ते पेन्सिलने लिहिले जाते. नंतर त्यावर सही केली जाते.

समितीने रजेवर असलेल्या; पण हजेरी पुस्तकावर सह्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यावरील सह्या आपल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साळुंखे यांनी समितीला याबाबत योग्य माहिती दिलेली नाही. अनुपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मिळणारे प्रत्येकी साठ रुपये मिळविण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 
(क्रमश:) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT