PDCC Bank
PDCC Bank Google
पुणे

पुणे जिल्हा बॅंकेसाठी लॉकडाऊनचे वर्ष लकी; ठेवीत १ हजार कोटींनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी (पीडीसीसी) लॉकडाऊनचे वर्ष लकी ठरले आहे. बँकेच्या ठेवीत आणि ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) ठेवीत तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली आहे. यामुळे बँकेच्या एकूण ठेवींनी ११ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या ठेवी वाढल्यामुळे आता जिल्हा बँकेला कर्ज वितरणाच्या रकमेत वाढ करता येणार आहे. याचा फायदा शेतकरी आणि अन्य सभासदांना होऊ शकणार आहे. शिवाय बॅंकेला २८२ कोटी ५१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेने ओळख निर्माण केली आहे. त्यातच आता देशातील सर्वाधिक ठेवी असलेली बँक म्हणूनही जिल्हा बँकेने नवी ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षभरापासून देशात कोरोना संसर्गाचे संकट आहे. अशा संकटाच्या काळातसुद्धा एवढ्या मोठ्या रकमेने ठेवीत वाढ करण्यात यश आले आहे. स्थापनेपासून आजतागायतच्या बॅंकेच्या १०४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवींमध्ये वाढ झाली आहे.

गतवर्षी ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत दहा हजार कोटींच्या ठेवी होत्या. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात बॅंकेला २७४ कोटींचा ढोबळ नफा झाला होता. त्यात २०२०-२१ या सरत्या आर्थिक वर्षात आणखी साडेआठ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे ढोबळ नफ्याचा नवा उच्चांक नोंदला गेला आहे. जिल्हा बँकेची एकूण उलाढाल १९ हजार १९८ कोटी ५५ लाख रुपयांची तर भागभांडवल ३३८ कोटी ८० लाख रुपयांचे असल्याचे जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.

एनपीए शून्य टक्क्यावर

दरम्यान, जिल्हा बँकेचा एनपीए (अनुत्पादित कर्ज दर) शून्य टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी व कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केल्याने बँकेचा ग्रॉस व नेट एनपीए नाबार्डने निश्‍चित करून दिलेल्या निकषांच्या आत आणण्यात बँकेला यश आले आहे.

- बँकेची सभासद संख्या --- १० हजार ९६४

- एकूण सभासदांपैकी सहकारी संस्था सभासद --- ९ हजार २३१

- व्यक्ती सभासद --- १ हजार ७३३

- विविध संवर्गांना एकूण कर्ज वाटप ---

८ हजार १११ कोटी ५ लाख रुपये

- एकूण गुंतवणूक --- ५ हजार २३३ कोटी ८१ लाख रुपये

पुणे जिल्हा बँकेने ठेवी, ढोबळ नफा, गुंतवणूक, कर्ज वाटप, कर्ज वसुली, भागभांडवल आणि नेट वर्थ या सर्वच बाबींमध्ये देशात नवा उच्चांक केला आहे. देशात कोरोनाचे संकट असतानासुद्धा ठेवी आणि ढोबळ नफ्यात उच्चांकी वाढ होणारी पुणे ही एकमेव जिल्हा बँके ठरली आहे. बँकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार, शेतकरी सभासद आदींनी बँकेवर दाखवलेला विश्‍वास व सदिच्छांमुळेच हे शक्य होऊ शकले आहे. भविष्यातही बँके अशाच पद्धतीने उत्तुंग यश प्राप्त करेल, अशी संचालक मंडळाला खात्री आहे.

- रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बॅक, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT