खग्रास चंद्रग्रहणानिमित्त
श्री विठ्ठलाच्या नित्योपचार वेळेत बदल
पंढरपूर, ता. १ : मंगळवारी (ता. ३) खग्रास चंद्रग्रहण असल्याने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात येत आहेत. पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी ६.३४ वाजता असून मोक्ष सायंकाळी ६.४८ वाजता आहे. पंढरपूर येथे सूर्यास्त सायंकाळी ६.३४ वाजता होत असल्याने सायंकाळी ६.३४ ते ६.४८ (एकूण १४ मिनिटे) या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात येणार आहेत.
ग्रहण काळातील प्रमुख बदल
- काकड आरती व नित्यपूजा ः पहाटे ४ ते ५.५५ वाजता नेहमीप्रमाणे
- महानैवेद्य ः सकाळी १०.४५ ते ११.०० वाजता. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा नैवेद्य दाखविण्यात येईल
- पोशाख व दुपारचा नैवेद्य ः ४.३० ते ५.०० वाजता. ग्रहणाचा वेध सुरू होणार असल्याने लाडूचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा दाखविण्यात येईल.
- ग्रहण स्पर्शानंतर सायंकाळी ६.३४ वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदी (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येईल. ग्रहण मोक्षानंतर (सायंकाळी ६.४८ वाजता) सर्व देवतांना पुन्हा स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात येईल.
- धुपारती रात्री ९.३० वाजता, शेजारती रात्री १२ वाजल्यानंतर नेहमीप्रमाणे होईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.