Cyber Crime esakal
पुणे

Online Fraud : परदेशात नोकरीचे आमिष; १२ लाखांना लुबाडले

परदेशातील कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - परदेशातील कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला हरियानातील गुडगाव येथून अटक केली. आरोपीकडून लॅपटॉप, तीन मोबाईल संच आणि १२ लाखांची रोकड हस्तगत केली आहे.

याबाबत एका व्यक्तीने पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जयंतकुमार परमानंद मलिक (वय-२९, रा. पालमविहार, गुडगाव, हरियाना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी शर्मा आणि करण सिंग नावाच्या व्यक्तींनी मोबाईलवरून फिर्यादीशी संपर्क साधला.

ते एका सल्लागार कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला इ-मेल पाठविला. त्यात परदेशातील एका कंपनीत वरिष्ठ महाव्यवस्थापक पदावर नोकरी मिळवून देतो, असे सांगून शर्मा आणि सिंग यांनी त्यांना लिंक पाठवली.

फिर्यादीने त्यांना लिंकवरून ११ लाख ९१ हजार रुपये पाठविले. परंतु नोकरी न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी १८ जुलै रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पैसे पाठविण्यासाठी दिलेली लिंक आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यात आरोपी दिल्ली आणि गुडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी पोलिसांचे पथक दिल्ली, हरियाना येथे पाठविले. या पथकाने आरोपी मलिक याला गुडगाव येथून अटक केली.

न्यायालयाने आरोपीला २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुपे-पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

Marathi News Live Updates : १९३१ नंतर प्रथमच जातीची माहिती; जनगणनेत नागरिकांना विचारले जाणार ४० प्रश्न

IND vs SL 1st Test : भारत-श्रीलंका पहिली कसोटी Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् मोबाईलवर कुठे पाहता येणार

SCROLL FOR NEXT