पुणे

हजरत पीर राजे बागसवार उरूस यंदा रद्द

CD

माळेगाव, ता. २० : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे माळेगावात (ता. बारामती) पुढील काही दिवस सण किंवा उत्सव साजरा न करण्याचा एकमुखी निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार यंदाचा हजरत पीर राजे बागसवार यांचा होणारा पारंपरिक उरूस रद्द करण्यात आला आहे.
माळेगावातील सर्व समाजबांधव, भाविक भक्त आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेला हा उरूस गावाच्या एकोप्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. मात्र, दुःखाच्या याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करणे उचित नसल्याची भावना माळेगावकरांनी व्यक्त केली.
उरुसाऐवजी केवळ धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्यात येणार असून कोणतेही सांस्कृतिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती शिवराजसिंह लक्ष्मणसिंह राजे जाधवराव व गुलाब दिदअलीशाह फकीर (इनामदार) यांनी दिली.
दरम्यान, माळेगावच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आल्याने वातावरण भावनिक झाले आहे. ‘दुःखातही एकजूट’ हा संदेश देत माळेगावकरांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT