पुणे

महाबळेश्वर गहू गेरवा संशोधन केंद्रातील उपक्रमांची कुलगुरूंकडून पाहणी

CD

महाबळेश्वरातील संशोधन केंद्रास कुलगुरूंची भेट

विविध प्रयोगांचा घेतला आढावा; समाधान व्यक्त

महाबळेश्वर, ता. १ : येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी नुकतीच भेट देऊन विविध संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
या भेटीदरम्यान डॉ. विलास खर्चे यांनी प्रायोगिक क्षेत्राची पाहणी करून रब्बी हंगामात घेण्यात येत असलेल्या गहू, स्ट्रॉबेरी, मिरची, बटाटा व विदेशी भाजीपाल्याच्या प्रयोगांची माहिती घेतली. देशातून तसेच परदेशातून येणाऱ्या गव्हाच्या वाणांची तांबेरा रोग प्रतिकारक क्षमता तपासण्याचे महत्त्वाचे काम हे केंद्र करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राच्या बांधकामाची पाहणी करून कुलगुरूंनी स्ट्रॉबेरीसोबतच इतर उद्यानविद्या पिकांच्या प्रायोगिक चाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड यांनी चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन केले, तसेच शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंचाचे बळकटीकरण करण्यावर त्यांनी भर दिला. प्रभारी गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम आणि कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशिर यांनी प्रायोगिक क्षेत्र, काचगृह येथील संशोधन प्रयोग आणि पीक रोग निदान केंद्र प्रकल्पाची माहिती सादर केली, तसेच संशोधन केंद्रावरील उपक्रमांचे सादरीकरण केले. कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी यांनी आभार मानले. याप्रसंगी संशोधन केंद्राचा कर्मचारी उपस्थित होता.

01651
महाबळेश्वर : येथील गहू गेरवा संशोधन केंद्रातील कामाची पाहणी करताना डॉ. विलास खर्चे, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. सुनील कराड आदी.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

IRAN-AMERICA WAR REASON : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला का केला? 'या' 5 कारणांमुळे सुरू झालंय भीषण युद्ध, काळीज पिळवटणारे व्हिडिओ

Pune Illegal Construction: नियमबाह्य बांधकामे थांबवा; पुणे महापालिका आयुक्तांकडून प्रशासनाला आदेश

Baramati News: माळेगावात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; मदतीला धावलेल्या युवकाचाही दुर्दैवी अंत

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT