Mahadev Jankar critics on bjp pankaja munde maharashtra politics dro95  
पुणे

Baramati Loksbha: जानकरांनी मागितली बारामती लोकसभा; राष्ट्रवादीमधल्या फुटीचा फायदा उठवणार ?

मिलिंद संगई, बारामती

Baramati Loksbha: यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय चित्र काहीसे वेगळे असेल अशी शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट मागितलेले असून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

बारामतीत जनसस्वराज यात्रेच्या निमित्ताने महादेव जानकर यांचे सोमवारी (ता. 28) रात्री उशीरा आगमन झाले. जानकर यांचे 'रासप'चे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे ,तालुकाध्यक्ष अँड अमोल सातकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

त्या नंतर पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या समितीकडे बारामती ,माढा आणि परभणी लोकसभा मतदार संघाची मागणी केली आहे. याबाबत समितीने अजून 'ग्रीन सिग्नल'दिलेला नाही, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी चांगली लढत दिली होती. यंदा महादेव जानकर उभे राहिल्यास चित्र काहीसे वेगळे असू शकते.

देशभर जनस्वराज्य यात्रा काढून 543 लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मी भेद करत नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी मित्र पक्षांचे असेच हाल केले. भाजपही सत्तेत असल्यावर असेच करणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षच मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनस्वराज्य यात्रा काढली आहे.

ते म्हणाले, 'घराणेशाही संपवून सामान्य माणूसही या देशाचा मालक झाला पाहिजे. हाच हेतू ठेवून देशात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढली आहे. मतदारांना जागृत करून जनतेचे राज्य आले पाहिजे. या हेतूने मागील दीड महिन्यांपासून विठ्ठलाला साकडं घालून जनस्वराज्य जनस्वराज यात्रा काढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत बोलताना ते म्हणाले , 'पवार साहेब आणि सुप्रिया ताई म्हटल्या की, अजित पवार आमचे नेते आहेत. मला वाटते की या दोघांचं म्हणणं एकच असेल. या दोघांच्या भांडणात लक्ष न घालता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला पाहिजे,'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT