पुणे

'बारामतीतून लोकसभा कपबशी घेऊन लढणार'

सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या राज्यात मंत्री असले तरी त्यांची आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची दांडगी इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण बारामतीतून लढणार, आणि तेही कपबशी ही निशाणी घेऊन, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

जानकर यांनी 2014 मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार टक्कर दिली होती. पराभूत झाले असले तर भारतीय जनता पक्षाने जानकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देत कॅबिनेट मंत्री केले होते. राज्याच्या कारभारात ते मग्न असले, तरी आगामी लोकसभा लढण्यासाठी त्यांनी शड्डू ठोकला आहे. आगामी लोकसभा आपण बारामतीतून लढणार आहोत, असे सांगत त्यांनी आपला मनसुबा स्पष्ट केला. ही निवडणूक आपण भाजपच्या कमळ नव्हे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावरच लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील आगामी काळात युतीबाबत आपला काय अंदाज आहे, असे विचारले असता, कोणी कितीही बोलू द्या, काहीही बोलू द्या, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही राज्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे एकत्रितपणे लढतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केले. 

मला इंग्लिश खेळ दाखवले 
मी महाविद्यालयीन आयुष्यात कुस्ती आणि व्हॉलिबॉल खेळ खेळत होतो. हे खेळ मला आजही आवडतात आणि हे दोन्ही खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. असे असताना मला "खेलो इंडिया 2019'ला भेट दिल्यावर इंग्लिश खेळ दाखवले. मला देशी खेळ अधिक पसंत आहेत, असे जानकर यांनी सांगितले. या दरम्यान त्यांच्यासह फोटो काढण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या डोक्‍यावर असलेला गॉगल जानकर यांनी काढून घेत, तो आपल्या डोळ्यांवर लावत फोटोसाठी पोज दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT