पुणे

आकृतिबंध रद्दचा प्रस्ताव पुढील आठवड्यात

CD

‘कृषी’चा आकृतिबंध रद्दचा
प्रस्ताव पुढील आठवड्यात

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : कृषी विभागाने तयार केलेला २३ हजार ४७६ पदांचा आकृतिबंध अखेर स्थगित केला असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत तो रद्द करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या बाबतची माहिती दिली. तत्पूर्वी मंगळवारी (ता. १५) सकाळी कृषिमंत्री भरणे यांच्यासोबत कृषी सचिव परिमल सिंग आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आकृतिबंधातील उणिवा आणि त्यावर राज्यभर झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार हा आकृतिबंध रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश भरणे यांनी दिले. त्याप्रमाणे कृषी विभागाने सामान्य प्रशासन विभागाला या बाबतची माहिती दिली असून प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कृषी विभागाने तयार केलेल्या आकृतिबंधाबाबत कर्मचारी आणि अधिकारी संमत नाही. त्यामुळे हा आकृतिबंध रद्द करून नव्याने तयार करण्याबाबत विभागाला निर्देश देण्यात येतील, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. आकृतिबंध मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाल्याने त्याबाबतच्या नियमानुसार प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.
कृषिमंत्री भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आकृतिबंध विरोधात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती दिली. १७ वर्षांनी कृषी विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला होता. यामध्ये तांत्रिक आणि अ तांत्रिक अशी विभागणी केली होती. टप्प्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या समोर येत गेल्या. तसेच कृषी महासंघाने टप्प्याटप्प्याने आंदोलनाची घोषणा केल्याने ऐन दुष्काळाचे सावट असताना कृषी विभागाचे कामकाज विस्कळीत झाले होते.
राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधातील आंदोलन जोर धरत असल्याने मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात कृषिमंत्री भरणे यांना आकृतिबंध संदर्भातील आंदोलनाबाबत तातडीतील तोडगा काढावा, असे निर्देश दिले होते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असेल तर त्यातील चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत, असेही सांगितले होते. त्यामुळे कृषिमंत्री भरणे यांनी पुण्यात जाऊन आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी आकृतिबंध रद्द करण्याची घोषणा केली होती.

कोट ----
मी घोषणा केल्याप्रमाणे आकृतिबंध रद्द करण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सामान्य प्रशासन विभाग प्रस्ताव सादर करेल. त्यावेळी आकृतिबंध रद्द होईल.
- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : गणपती दर्शनासाठी चंद्रकांत पाटील यांचा रिक्षाने प्रवास

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

SCROLL FOR NEXT