PNE26W41153
अहिल्यानगर ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्थापनादिनानिमित्त डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
---------------------
‘अंनिस’ समाज सुधारकांचा
वारसा जपणारी संघटना ः बुधवंत
अहिल्यानगर, ता.९ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही प्रबोधनाची चळवळ चालवणारी, पुरोगामी विचार मांडणारी, संत आणि समाज सुधारकांचा वारसा जपणारी संघटना आहे, असे प्रतिपादन अंनिसचे जिल्हाध्यक्ष व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाबासाहेब बुधवंत यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट अंनिस स्थापना दिनानिमित्त जीवन प्राधिकरण कार्यालय तारकपूर येथे आयोजित कार्यक्रमात बुधवंत बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला गुलाब फुले वाहून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जोंधळे होते. या वेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व्ही. एम. कुलकर्णी, ए. टी. डफळ, रोहिदास थोरात बी. टी. सुरोशी, एन. एस. पठाण, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, प्रधान सचिव विनायक सापा आदी उपस्थित होते.
यावेळी अंनिसचे जात पंचायत जिल्हा कार्यवाह कारभारी गायकवाड, शहर प्रधान सचिव ठकाजी जगधने, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब सुडके, शहर बुवाबाजी संघर्ष सचिव अनिता सापा, शहर महिला विभाग प्रमुख मेघा झावरे, शहर संविधान विभाग सचिव गौरी गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विजय वांढेकर यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. चव्हाण यांनी आभार मानले.
-------
चौकट
चमत्काराचे प्रात्यक्षिके
विष्णू गायकवाड आणि विनायक सापा यांनी विविध चमत्काराचे प्रात्यक्षिके सादर करून त्यातील मर्म समजून दिले. समाजातील सुशिक्षित वर्ग अंधश्रद्धेला बळी पडत असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण करण्यावर भर देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.