Maharashtra Bandh Ajit Pawar Participate In Maratha Kranti Morcha Agitation  
पुणे

Maratha Kranti Morcha : अजित पवारांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा

मिलिंद संगई

बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला.

गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. माध्यमांसह राज्याचे लक्ष या ठिकाणी होते. मात्र अजित पवार भल्यापहाटेच पुण्याहून निघाले आणि सकाळी आठ वाजताच गोविंद बाग येथे पोहोचले.

प्रथम सहयोग या आपल्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार अशी मला माहिती मिळाली होती. माझ्या घरासमोर आंदोलन होणार असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो होतो. मात्र पवारसाहेबांच्या घरासमोर आंदोलन स्थळ असल्याचे समजल्यावरुन मी येथे आलो, असे स्वतः अजित पवार यांनीच नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सव्वा दहाच्या सुमारास अजित पवार आंदोलनस्थळी आले. इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच रस्त्यावर मांडी घालून बसले, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर उभे राहत त्यांनी माईकवरुन एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाह कुणाच्या बापाच...कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा दिल्या. मराठा समाजातील मुलींनी दिलेले निवेदन स्विकारत आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे सांगत ते बाहेर पडले. 
खुद्द अजित पवार आंदोलनात सहभागी होणार याची कल्पना मोजक्याच लोकांना होती, मात्र कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून रस्त्यावर बसत अजित पवार यांनी आपला पाठींबा आज दाखवून दिल्याचीच चर्चा नंतर शहरात होती. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT