बारावीची एक प्रश्नपत्रिका गायब
विज्ञान विषयांच्या पेपरदरम्यान प्रकार; अनेक केंद्रांवरील पर्यवेक्षकांची तक्रार
मंगेश गोमासे : सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २६ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या पेपरदरम्यान केमेस्ट्री आणि फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर आल्यावर शिक्षण मंडळात एकच खळबळ उडाली होती. असे असताना, बऱ्याच केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या सीलबंद लिफाफ्यांमध्ये २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका येत असल्याची तक्रार केंद्रातील पर्यवेक्षकांनी नोंदविली आहे. या प्रकाराचा पेपरफुटीच्या प्रकरणाशी याचा संबंध आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारावीच्या पेपरदरम्यान १६ फेब्रुवारीला फिजिक्स, १८ फेब्रुवारीला केमेस्ट्री, २१ फेब्रुवारीला गणित आणि २५ फेब्रुवारीला बायोलॉजी या विज्ञान शाखेतील विषयांचे पेपर घेण्यात आले. मात्र, या विषयांचे पेपर होत असताना, शहर आणि ग्रामीण भागातील काही केंद्रांवर बोर्डाकडून आलेल्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या पाकिटात २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका आल्याची माहिती समोर आली. याबाबत केंद्रावरील पर्यवेक्षकांनी याची माहिती केंद्र संचालकांना दिली. त्यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. याप्रकरणी बोर्डाने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यांचे महाविद्यालयांशी साटेलोटे असल्याचेही दिसून आले. त्यांच्याकडे हे पेपर कुठून आले हे प्रश्न अनुत्तरीत आहेत? मात्र, असे असताना, अनेक केंद्रावर आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या लिफाफ्यातून एक प्रश्नपत्रिका गायब असणे हा प्रकार या दोन्ही घटनांचा कुठेतरी एकमेकांशी संंबंध आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. दरम्यान मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी काही केंद्रावर पेपर कमी आल्याच्या घटना घडल्या असल्याचा दुजोरा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.