पुणे

राज्याच्या गृहमंत्र्यांची पुणे पोलिस आयुक्तालयाला भेट

सूरज यादव

पुणे - पोलिस दलातील बदल्यामध्ये जेवढी पारदर्शकता आणता येईल, तेवढे महत्वाचे आहे. ओळखीच्या किंवा वशिल्याच्या लोकांना चांगल्या ठिकाणी बदली मिळण्यापेक्षा त्यांच्याकडुनच अर्ज मागवून संधी दिली, तर चांगला संदेश जाईल.त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी अंतर्गत बदल्यासाठी विकसित केलेली जनरल ट्रान्सपोर्ट पोलिस मैनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) प्रणाली पोलिसांसाठी फ़ायदेशीर आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पद स्विकरल्यानंतर पहिल्यांदा पुणे पोलिस आयुक्तालास भेट दिली. यावेळी वळसे पाटील यांनी पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल, गुन्हे शाखा, नागरिक सहायता कक्ष आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते.

जालना येथील भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरणाबाबत वळसे पाटील म्हणाले, "जालना येथील भाजपा कार्यकर्ताला पोलिसांनी केलेली मारहाणीची घटना 9 एप्रिल रोजीची आहे. ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये (आईसीयू) गोंधळ घालत होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, मात्र हि कारवाई जरा जास्तच झाली. याबाबत जालना पोलिस अधिक्षकांना सांगुन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत."

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याआ रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता त्यांनी टिका केली. वळसे पाटील म्हणाले, " सध्या कोरोनामुळे पोलिस व आरोग्य विभागावर ताण आहे. त्यामुळे कोणीही चितावणीखोर वक्तव्य करु नये" असा टोला त्यांनी लगावला.

गुंडगिरीला पाठीशी घालणाऱ्यावर कठोर कारवाई

सराइत गुंड वाघाटे याच्या अंत्यसंस्कारवेळी निघालेली रैलीची घटना चूकीची आहे. पोलिसांनी त्याची योग्य दखल घेऊन कारवाई केली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकाराची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अशा पद्धतीने नागरीकांचे वागणे चुकीचे आहे. कोरोनाच्या कालावधीत कोणी अशी कृत्य करीत असतील, तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करतीलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT