Shivraj Rakshe 
पुणे

Maharashtra Kesari: "कुठलीही माघार कायमची माघार नसते"; अजित पवारांनी केलं शिवराज राक्षेचं अभिनंदन

महाराष्ट्र केसरीची फायनल खेळणारे दोन्ही फायनलिस्ट हे एकाच तालमीतले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अखेर आज संपला. पुणे जिल्ह्यातील शिवराज राक्षे यानं प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याला चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. यानंतर विविध क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. यामध्ये विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील दोन्ही फायनलिस्टचं अभिनंदन केलं आहे.

अजित पवार यांनी विजेत्या शिवराज राक्षेचं विशेष कौतुक केलं आहे. कारण गेल्यावर्षी त्यानं या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण यंदा स्पर्धेत त्यांना सातत्यानं चांगला खेळ केला. त्यामुळंच तो महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरू शकला. त्यामुळं कुठलीही माघार माघार नसते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी ट्विट करत म्हटलं की, "'महाराष्ट्र केसरी' किताब विजेता मल्ल शिवराज राक्षे आणि उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकून कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. महाराष्ट्राची गौरवशाली कुस्तीची परंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. राज्यातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी राज्य सरकारनं पार पाडावी"

दोघेही फायनलिस्ट हे वस्ताद काका पवार यांच्या तालमीतलेच आहेत. त्यांना एकमेकांचा खेळ चांगलाच माहिती असल्यानं त्यांनी खेळ लवकरच संपवला. शिवराज राक्षेनं केवळ तीस सेकंदातच प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याला चितपत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT