पुणे

सासवडमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड चाचणी स्पर्धा

CD

​सासवड, ता. २१ : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील मल्लांची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (ता.२१) सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलात दिमाखात पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी पुरंदर मधून प्रतीक जगताप याची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे उद्‍घाटन जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना लोळे म्हणाले की, स्व. चंदुकाका जगताप यांनी हे कुस्ती संकुल सुरू करून तालुक्यातील कुस्ती आणि लाल मातीला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला. हेच कार्य माजी आमदार संजय जगताप यांनी समर्थपणे पुढे नेत मल्लांना मोठे पाठबळ दिले आहे. तसेच, आगामी गावोगावच्या यात्रांमध्ये स्थानिक मल्लांना संधी देण्याचे आवाहनही त्यांनी आयोजकांना केले.

​याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच राजेंद्र वरे यांनी संकुलातील सुविधांचे कौतुक केले. यावेळी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील विजेते प्रतीक जगताप आणि रितेश मुळीक यांचा विशेष गौरव करण्यात आला. बालगट आणि वरिष्ठ गटात स्पर्धा निर्विवाद झाल्याचे पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा समितीचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य राजेंद्र जगताप, तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य अण्णा कामथे, गुलाब गायकवाड, अशोक झेंडे, बाळासो कोलते, भाऊ मोरे, रघुनाथ जगताप, प्रशिक्षक माउली खोपडे, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, सुधाकर गिरमे, रामभाऊ इनामके, राजेंद्र बांदल, शेखर कटके, उत्तम शेटे, नीलेश डांगे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र वरे, सहायक पंच चिराग तोमर यांच्यासह क्रीडा शिक्षक राजेंद्र जगताप, संजय भिंताडे, प्रल्हाद कारकर, गणेश कोलते, मोहन नातू, शिवाजी गोडसे यांनी स्पर्धेचे चोख नियोजन केले. रवींद्रपंत जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर राजेंद्र जगताप यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT