maharashtra Pune police real hero Actress Nityashree Dnyanlaxmi
maharashtra Pune police real hero Actress Nityashree Dnyanlaxmi 
पुणे

अभिनेत्रीनं शेअर केली पुण्यातील खाकी वर्दीतील 'रिअल हिरोंची स्टोरी'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शनिवारी मध्यरात्री ठिक 1 वाजताची वेळ. एक तरुण अभिनेत्री तिचा नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर घरी जाण्यासाठी बालगंधर्व नाट्यगृहासमोर रिक्षा, ओला कैबची वाट पाहत थांबली होती, पण बराच वेळ तिला वाहन मिळाले नाही, आता मात्र तरुणीला काळजी वाटू लागली, तेवढ्यात अनपेक्षितपणे तिथे खऱ्या हिरोंची म्हणजेच आपल्या पोलिसांची "एंट्री" झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी तिची विचारपूस केली, आपल्या पोलिसांच्या गाडीत बसवून पुढे रिक्षातुन घरी सुरक्षितपणे पोचविले...!

शहरात लागोपाठ घड़लेल्या काही घटनांमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुढे येत असतानाच शनिवारी घड़लेल्या या घटनेने पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कर्तव्य ततपरता हा प्रसंग तुम्हाला एखाद्या चित्रपट किंवा मालिकेतील "स्टोरी" प्रमाणे वाटेल. परंतु, हि "रिअल स्टोरी" आहे, तिही आपल्या पुणे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठतेची. हा सुखद अनुभव घेतला आहे, अभिनेत्री नित्याश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी. तर घडेलेली घटना अशी. शनिवारी रात्री बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख भुमिका असलेला "मोरूची मावशी' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा प्रयोग रात्री ठीक १२ वाजता संपला. याच नाटकात नित्याश्री या भरत जाधव यांच्या "संध्या" नावाच्या प्रेयसीचीही भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगानंतर सगळे कलाकार जेवण करुन निघाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुण्यातच नाटकाचा प्रयोग असल्याने बाकी सगळे कलाकार हॉटेलमध्ये थांबणार होते. तर नित्याश्री या कर्वेनगर येथे राहणाऱ्या असल्याने त्यांनी घाईघाईत जेवण आटोपून घरी जायचे ठरविले. तरीही त्यांना निघेपर्यंत मध्यरात्री एक वाजले.बालगंधर्ववरून कर्वेनगर दूर नसल्याने त्यांना तशी भीती वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी ओला कैब बुक केली, परंतु तिही रद्द झाली. त्यामुळे त्यांनी रिक्षाची वाट पाहिली. परंतु रिक्षाही मिळाली नाही.

एरवी माणासांच्या, वाहनाच्या गर्दीने ओसांडून वाहनारा हाच जंगली महाराज रस्ता शांत होता. तेवढ्यात एखाद्या चित्रपट किंवा मालिकेत घडावा असा प्रसंग घडला. "त्या" रात्रीच्या सामसूम रस्त्यावरून अनपेक्षितपणे खऱ्या "हिरों"ची "एन्ट्री" झाली. होय पुणेकरांच्या दृष्टीने तेच खरे हीरो आहेत. रात्री रस्त्यावर थांबलेली तरुणी बघून पोलिसांची तिच्यासमोर येऊन थांबली. गाडीत रात्रगस्तीवर असणारे डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले आणि त्यांच्यासमवेत पोलिस कर्मचारी शरद गोरे व रामदास गद्रे होते. त्यातील मोगले यांनी गाडीतून खाली उतरून नित्याश्री यांची आस्थेने चौकशी केली. त्यांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ त्यांच्यासाठी रिक्षा पाहू लागले. शेवटी वाट पाहून त्यांनी नित्याश्री यांना त्यांच्या गाडीत बसण्याची विनंती केली. त्यानुसार, नित्याश्री त्यांच्या गाडीत बसल्या. काही अंतरावर पोलिसांना रिक्षा दिसल्या. पोलिसांनी रिक्षाचालकाला जवळ बोलावून त्यांना सुव्यवस्थित स्थळी पोहोचवण्यास सांगितले. एवढेच नाही, तर त्यांनी रिक्षाचा नंबर, चालकाची सर्व माहिती घेतली. दरम्यान, आत्तापर्यंत एखाद्या चित्रपटात घडणाऱ्या प्रसंगाप्रमाणे नित्याश्री तो प्रसंग अनुभवत होत्या, क्षणभरात तेथून निघताना नित्याश्री यांनाही हा अभिमानाचा, सुरक्षेची हमी देणारा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही. नित्याश्री यांनी क्षणार्धात पोलिसांसमवेत सेल्फी घेत त्यांच्या कार्याला सलाम केला आणि थोड्या वेळातच नित्याश्री त्यांच्या घरी सुखरूप पोचल्या.दरम्यान, नित्याश्री यांनी हा अनुभव फेसबुकवर मांडल्यानंतर पोलिसांचे कौतुक झाले.

"खरंच सणवार,घरातील सुखदुःखाचे प्रसंग,अगदी कुटुंबपणाला लावून जे अहोरात्र केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर असतात,त्या खऱ्या हिरोंना माझा मानाचा मुजरा. पोलिसांचे करावे तितके कौतुक कमी आहे. मी मुळची मुंबईची आहे व पुण्यातही राहते.मला आलेला अनुभव खुप छान होता. कलाकारापेक्षा माणुस म्हणून मला आलेला अनुभव कमाल होता. त्यामुळेच मी पोलिस अधिकारी संजय मोगले यांना पुन्हा फोन करुन आभार मानले आणि त्यांचे कौतुक ही केले."

- नित्याश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील

" आम्ही रात्रीच्या वेळी महिला, वृद्ध व अडचणीमध्ये सापडलेल्या नागरीकांना कायम मदत करतो, त्यानुसार, नित्याश्री यांनाही मदत केली. त्या अभिनेत्री असल्याचे आम्हाला त्यांच्याकडून समजले. त्यांनी आमच्यासोबत सेल्फी घेतली, त्याचबरोबर आमचे कौतुक केले. आम्ही कायम टिकेचे धनी ठरत असतो, त्यात अशी कौतुकाची थाप काम करण्यास उभारी देते."

- संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे), डेक्कन पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर; वर्षा गायकवाड यांच्याविरोधात लढणार

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT