khed-aalandi
khed-aalandi 
पुणे

खेड आळंदी : भाजपची बंडाळी शिवसेना भोवली, राष्ट्रवादीला पावली | Election Results 2019

विलास काटे

आळंदी (पुणे) : खेड- आळंदी मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दिलिप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्यावर 33 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविला आणि मागिल निवडणुकीत शिवसेनेकडे गेलेला हक्काचा गड राष्ट्रवादीने पुन्हा सर केला. खेड आळंदी विधानसभेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपली मांड कायम राखली.

शिवसेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांचा गट तटस्थ राहिल्याने आणि अपक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यासह भाजप पदाधिकाऱयांनी केलेली युतीची बंडाळीच गोरेे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. दिलिप मोहिंतेे यांच्या विजयाने राष्ट्रवादीचे मतदारसंघात वर्चस्व सिद्द झाले असून, तालुका शरद पवार यांच्या विचाराला मानणारा असल्याचे पुन्हा एकदा मतदारांनी दाखवले.

खेड तालुक्याच्या पट्ट्यात सुरूवातीपासून राष्ट्रवादीने आघाडी घेतली. शिवसेनेच्या मतदारांवर अपक्षाने डल्ला मारला. पूर्व पट्ट्यातील मतदानातील आघाडी विसाव्या फेरीनंतर वाढल्याने मोहितेे यांनी निर्णायक आघाडी घेतली. पश्चिम पट्ट्यात शिवसेना पिछाडीवर राहीली, तर चाकण पट्ट्यात आल्यानंतर मुसंडी मारत दुसऱया क्रमांकावर आली.

तसेच, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला. अपवाद फक्त मागील निवडणूकीचा. मागील निवडणूकीत शिवसेनेच्या सुरेश गोरेे यांनी दिलिप मोहितेे यांना मोठ्या फरकाने पराभूत करून राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान दिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाने राष्टवादीच्या कार्यकर्त्यांना खेडवर वर्चस्व मिळविण्याची संधी चालून आली. एवढे असूनही निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीत बेदिली दिसली. जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, पंचायत समिती सभापती रामदास ठाकूर यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले. त्यांची नाराजी दुर करण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. परिणामी दिलिप मोहिते यांचा विजय झाला.

तशी निवडणूक सोपी नव्हती. कारण, मागील निवडणुकीप्रमाणेच मोहिते यांच्यावर गुंडगिरीचे आरोप झाले. मराठा आंदोलनात आरोपी बनविल्याने मोहिते थोडेसे खचले. त्यांना उमेदवारी पक्षाने अंतिम टप्प्यात दिली. मात्र, परिस्थीतीवर मात करून मोहितेंनी अखेरच्या 20 दिवसांतच पद्धतशीर प्रचार करून विजय मिळविला.

गोरे आणि अपक्ष देशमुख यांच्याबरोबरच्या तिरंगी लढतीत मोहिते यांनी विजय मिळविला खरा, पण देशमुख यांनीही ताकद पणाला लावून भाजपचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले. युवा वर्गाला खेचून घेण्यात देशमुखांना यश आले. मागील निवडणूकीत शरद बुट्टे यांना पंधरा हजाराहून अधिकच्या मतांमुळे भाजपने उभारी घेतली आणि देशमुख निवडणूकीला सामोरे गेले. युतीचा धर्म निभावण्याऐवजी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱयांनी अपक्ष देशमुखांना बळ दिले. परिणामी भाजपचे मतदार गोंधळले.

खेड आळंदीपुरती युती तुटली. खेड व आळंदी पालिकेत भाजपने पद्धतशिरपणे गेली काही वर्षात कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले. याच्या उलट राष्ट्रवादी आणि सेनेची अवस्था आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱयांमधे फूटाफूटी होती. माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांचा गट नामानिराळा राहिला. राष्टवादीत काही पदाधिकारी म्हणजे बडा घऱ पोकळ वासा, अशी अवस्था आहे. आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मजबूत फळी दोघांना तयार करावी लागणार असल्याचा धडा अपक्ष उमेदवाराने दोन्ही पक्षांना दिला हे नक्की. याचा विचार शिवसेना व राष्टवादीला करावाच लागेल. 

वास्तविक यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्दावर कमी, वैयक्तिक टिपाटिप्पणीवरच लढली गेली. देशमुख, मोहिते यांच्यावर गोरेे यांनी गुंडगिरीच्या छायेत तालुका असल्याची जहरी टिका केली. गोरे यांच्यावर मुका आणि निष्क्रिय आमदार म्हणून या दोघांनी टिका केली. याचबरोबर जातीपातीची पाळेमुळे घट्ट रूजल्याने माळी मराठा फॅक्टर चालला.

या वेळी गाव पातळीवरिल निवडणूकांप्रमाणे पैशांनी विकत घेण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात झाला. रोजंदारीसाठीचे स्थलांतरित मतदारांना खरेदी करण्याची चढाओढ दिसून आली. मतदार याद्यांमधे बाहेरच्यांची नावे घुसविण्यात आली. दहशतीची सुप्त लाट या वेळी निवडणूकीत पाहायला मिळाली. मतदारच काय पण काही पक्षांचे कार्यकर्ते स्वतःला थेट व्यक्त करत नव्हते. 

शरद पवार यांचा करिष्मा                                   खेड तालुका शरद पवार यांच्या विचारांचा मानला जातो. पवारांनी तालुक्यात औद्योगिक आणि धरणांचा विकास केला. याचबरोबर त्यांनी राज्यभर गाजविलेल्या सभा आणि साताऱयातील पावसात उभे राहून केलेले भाषणामुळे मतदारांवर अतिम टप्प्यात सकारात्मक बदल झाला. परिणामी मोहिते यांच्या विजयाने खेड आळंदी विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका असून त्यांच्या करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT