Bhor.JPG
Bhor.JPG 
पुणे

भोर : थोपटे- कोंडे यांच्यात काटे की टक्कर | election result 2109

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर विधानसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे संग्राम थोपटे व शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्यात घासून लढत सुरू आहे. विसाव्या फेरीअखेर थोपटे यांनी 936 मतांची आघाडी घेतली आहे. भोर मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत ही कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, शिवसेना-भाजपा युतीचे कुलदीप कोंडे आणि अपक्ष आत्माराम कलाटे यांच्यामध्येत तिरंगी लढत आहे. विसाव्या फेरीत संग्राम थोपटे यांना 870552, कुलदीप कोंडे यांना 861193, तर आत्माराम कलाटे यांना 7100 मते मिळाली आहेत. 

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांची उमेदवारी जाहीर असल्याने त्यांनी काही महिन्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी शिवसेनेची रथयात्रा काढून प्रचार केला आहे. तर अपक्ष उमेदवार यांनी निवडणूकीपूर्वीच आपल्या प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून त्यांना स्थानिक नाराजींची साथ आहे. तिकीटासाठी युतीच्या उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत रस्सीखेच सुरु होती. अखेर कुलदीप कोंडे यांनी बाजी मारली आणि युतीचे तिकीट मिळविले. परंतु युतीच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले आत्मराम कलाटे यांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून त्यांना मिळत असलेल्या पाठींब्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडूकीला सामोरे जात आहेत. याशिवाय मनसेचे अनिल मातेरे, वंचित आघाडीचे भाऊ मरगळे, संभाजी ब्रिगेडचे पंढरीनाथ सोंडकर आणि अपक्ष मानसी शिंदे आपापल्या परीने निवडणूकीला सामोरे जात आहेत. 

मतांची विभागणी शक्य
तिन्ही प्रमुख उमेदवारांनी विजयाची खात्री आहे. परंतु मतदारांच्या मनातील संभ्रमावस्ता पाहता मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. आपल्या तालुक्यातील स्थानिक उमेदवाराला मतांचे प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील उमेदवार विजयासाठी मतांची गणिते मांडत आहेत. आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यावरील नाराजीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते त्यांना मिळतील हे सांगणे कठीण होणार आहे. तसेच युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनाही भाजपाची मते मिळतील हेदेखील ठामपणे सांगता येणार नाही. राष्ट्रवादी कॉग्रेसची काही मते ही अपक्ष आत्माराम कलाटे यांना जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT