Maharashtra Vidhan Sabha election result Kasba trends early morning.jpg
Maharashtra Vidhan Sabha election result Kasba trends early morning.jpg 
पुणे

कसबा : महापौर मुक्ता टिळकांची हवा; काँग्रेस, मनसेला टाकले मागे | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या मुक्ता टिळक 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. लगेचच दुसऱ्या फेरीची सुरवात होईल. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदे लढत आहेत. 

कसबा विधानसभा मतदार संघ - 
भाजप:- मुक्ता टिळक - 21270 - आघाडीवर
काँग्रेस :- अरविंद शिंदे - 9438
मनसे :- अजय शिंदे - 2680

भाजपचे गेली 25 वर्षे आमदार असलेले व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मे महिन्यात खासदार म्हणून निवड झाल्यानंतर, भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनावडे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने, कसबा पेठ मतदारसंघातील मुख्य लढत चौरंगी झाली आहे. 

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पुण्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होती. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

मुक्ता टिळक या गेली साडेसतरा वर्षे या भागातून भाजपच्या नगरसेविका आहेत. अरविंद शिंदे यांनीही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते ही पदे भुषविली आहेत. 

भाजपच्या उमेदवारांनी 1978 पासून झालेल्या निवडणुकीत 1985 चा अपवाद वगळता या मतदारसंघातून विजय मिळविला. जनता पक्ष व भाजप यांच्यातर्फे अरविंद लेले, भाजपचे अण्णा जोशी, कॉंग्रेसचे उल्हास काळोखे यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 1992 च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे वसंत थोरात यांनी बापट यांचा पराभव केला होता. बापट 1995 पासून सलग पाच निवडणुकांत विजयी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT