Mahesh-Landage
Mahesh-Landage 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भोसरीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - लांडगे

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : भोसरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे सांगत २०१४ मध्ये महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्या वेळी वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. आमदारकीच्या काळात त्यांनी गेल्या पाच वर्षांतील केलेल्या कामाचा घेतलेला लेखाजोखा...

प्रश्‍न - अनधिकृत बांधकाम व शास्तीकराबाबत काय स्थिती?
लांडगे -
 २०१२ पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. याचमुळे सुरवातीच्या टप्प्यात एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकांमावरील शास्तीकर रद्द केला आहे. त्याचा फायदा सुमारे ६६ हजार मिळकतधारकांना झाला आहे. तसेच शास्तीकर माफ करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. आता दीड हजार चौरस फुटांपर्यंत पाठपुरावा करीत आहोत.

बफर झोन’ची हद्द कमी झाली?
- १३ वर्षांपासून प्रलंबित असलेला बफर झोनचा प्रश्‍न सोडवण्यात यश मिळाले आहे. स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ही हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

साडेबारा टक्‍के परतावा मिळणार?
- वेळोवेळी विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारसमोर चर्चा घडवून आणली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेतली. यामध्ये बाधित भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

समाविष्ट गावांच्या विकासासाठी काय प्रयत्न केले?
- कोट्यवधी रुपयांची रस्ते विकासाची तसेच आरक्षण विकासाची कामे सुरू आहे. यापूर्वी समाविष्ट गावांना महापालिकेत प्रमुख पदांवर काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्याचा परिणाम समाविष्ट गावांतील विकासकामांवर होत होता. मात्र आम्ही दोन महापौर, दोन क्रीडा समिती सभापती, एक महिला व बालकल्याण सभापती, तीन नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड केली.

रेड झोनविषयी काय पाठपुरावा केला?
- तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. यातूनच पहिल्यांदाच त्यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेत तोडगा काढण्याबाबत आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हा प्रश्‍न लांबणीवर पडला आहे. आता खासदार गिरीश बापट यांच्यामार्फत केंद्रीय मंत्र्यांकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. 

समाविष्ट गावांतील आरक्षणांच्या विकासाबाबत...
- गेल्या २० वर्षांत समाविष्ट गावांत अनेक सुविधांची वानवा होती. रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी विकास आराखड्याप्रमाणे समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. ‘भोसरी व्हिजन-२०२०मधील बहुतांश प्रकल्प समाविष्ट गावांत होत आहेत.

भोसरी उड्डाण पुलाखालील कोंडी...
- विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’ संकल्पनेअंतर्गत नियोजन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, गार्डन, ई-टॉयलेट आदी प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे.

क्रीडा क्षेत्राबाबत काय?
- भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल साकारत आहे. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमला गतवैभव प्राप्त करून पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक ‘स्पोर्टस्‌ सिटी’ म्हणून करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मगर स्टेडियमचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून नूतनीकरणाच्या कामासह ‘स्पोर्टस्‌ युनिव्हर्सिटी’ साकारण्याचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT