madhusudan-mistry
madhusudan-mistry 
पुणे

Vidhan Sabha 2019 : भाजपला सत्तेसाठी कशाचेही वावडे नाही - मधुसूदन मिस्त्री

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - ‘भाजप जमेल त्या मार्गाने परत सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ज्या लोकांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत लढले, त्यानांच आमिषे दाखवून पक्षामध्ये जाहीर प्रवेश  देण्यात आले. सत्तेसाठी भाजपला कशाचेही वावडे नाही,’’ अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे  महासचिव मधुसूदन मिस्त्री यांनी केली. 

काँग्रेसच्या वतीने मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, उल्हास पवार, मोहन जोशी, अंकुश काकडे, ॲड. वर्षा देशपांडे, अन्वर राजन, ॲड. असीम सरोदे, श्‍यामसुंदर सोन्नर, डॉ. विवेक कोरडे, हिरालाल पगडाल, श्रीकांत लक्ष्मी शंकर, ॲड. प्रभा सोनटक्के, अलीभाई शेख, ॲड. एम. एस. शिंदे, हृषीकेश पाटील, दिपेंती चिकणे, संतोष देशपांडे, ॲड. वनराज पवार, शाहीर कैलास जाधव, ॲड. शैलजा जाधव उपस्थित होते. 

मिस्त्री म्हणाले, ‘‘देशासमोरील संकटांना व विविध प्रश्नांना तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशाचे ऐक्‍य व अखंडत्व हे धोक्‍यात आले आहे. आज झुंडशाही, संविधानिक मूल्यांना दिली जाणारी तिलांजली, संस्थांच्या स्वायत्ततेला निर्माण झालेला धोका इत्यादीमुळे देशात यादवी निर्माण होईल इतकी गंभीर परिस्थिती आहे. यामुळे देशहितासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT