Naval-Kishor-Ram
Naval-Kishor-Ram 
पुणे

Vidhan Sabha 2019 : दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदारचिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. 

निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी दिव्यांग मतदारांच्या घरी भेटी देऊन नोंदणी केली आहे. त्यांना बस स्थानक, रेल्वे स्थानक, मॉल यांसह सार्वजनिक ठिकाणी मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदारचिठ्ठी आणि डमी मतपत्रिका, काचेचे भिंग आणि मतदार मार्गदर्शक पुस्तिका देण्यात येणार आहे.

दिव्यांग, ज्येष्ठ, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आयोगाने पीडब्ल्यूडी (PwD) ॲपची निर्मिती केली आहे.
टोल फ्री क्रमांक - १९५० किंवा १८००१११९५०.

निवडणूक हा राष्ट्रीय उत्सव आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. मतदान करणे आपले कर्तव्य असून, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा.
- नवल किशोर राम, जिल्हा निवडणूक अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT