पद्मावती - भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी रविवारी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. (दुसऱ्या छायाचित्रात)  भवानी पेठेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी मतदारांशी संवाद साधला.
पद्मावती - भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी रविवारी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. (दुसऱ्या छायाचित्रात) भवानी पेठेत काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी मतदारांशी संवाद साधला. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : उमेदवारांचा रविवार पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच रविवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाल्याने उमेदवारांनी केलेल्या प्रचाराच्या नियोजनावर पाणी फिरले. एकीकडे बंडखोरांची मनधरणी; तर दुसरीकडे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, गाठीभेटी आणि पदयात्रा... अशा धावपळीत उमेदवारांचा रविवारचा दिवस गेला. 

गेल्या आठवड्यात उमेदवारी मिळविण्याची गडबड सुरू होती. अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी मिळालेला आज पहिलाच रविवार होता. त्यातच प्रत्येक मतदारसंघात आणि पक्षांत बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (ता. ७) आहे. त्यामुळे एकीकडे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे रविवारचे निमित्त साधत पदयात्रा आणि गाठीभेटींचे नियोजन उमेदवारांकडून करण्यात आले होते; परंतु दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक उमेदवारांचे प्रचाराचे नियोजन कोलमडले. ऐनवेळी नियोजनात बदल करीत काही उमेदवारांनी गाठीभेटींवर भर दिला; तर काहींनी सकाळीच पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. सायंकाळी बैठका आणि मेळव्यांचे आयोजन करण्यात आले होते. काही उमेदवारांनी रविवारचे निमित्त साधत निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT