BJP
BJP 
पुणे

Vidhan Sabha 2019 : कसबा : भाजपच्या गडाला बंडखोरीचा धोका

सकाळ वृत्तसेवा

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्वासाठी सर्व पक्षांची लाढाई सुरू झाली आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांबरोबरच शिवसेनेने केलेली बंडखोरी, मनसेने रिंगणात मारलेल्या उडीमुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे. गेली पंचवीस वर्षे बंडखोरी आणि फुटीचा फायदा या मतदारसंघात नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडला. तो या वेळीही पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेली पंचवीस वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व गिरीश बापट यांनी केले. बापट खासदार झाल्याने हा मतदारसंघ आता भाजपकडे राहणार का, हा कळीचा प्रश्‍न आहे. भाजप-शिवसेना युतीने या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे रिंगणात उतरले आहेत.

युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी शिवसैनिक आग्रही होते; परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही, म्हणून बंडाचा झेंडा हातात घेऊन विशाल धनवडे यांनी रिंगणात उडी मारली; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराध्यक्ष अजय शिंदे यांना मैदानात उतरवून लढतीमध्ये रंग भरला आहे. अन्य पक्षांचे मिळून सुमारे दहा उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात आहेत.

या वेळी बापट रिंगणात नसल्याने विरोधी पक्षांना ही संधी वाटत आहे; तर बालेकिल्ला असल्यामुळे विजय निश्‍चित असल्याची खात्री युतीच्या नेत्यांना वाटत आहे. धनवडे यांची बंडखोरी आणि मनसेचे उमेदवार शिंदे यांच्या उमेदवारीचा फायदा कोणाला होणार, याबाबत राजकीय कार्यकर्त्यांकडून तर्कविर्तक बांधले जात आहेत. मतविभागणीवर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे ठरणार आहे. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींचा हा मतदारसंघ आहे. राजकीयदृष्ट्या जागृत मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा मतदारसंघ असल्यामुळे येथील प्रश्‍नही मोठे असल्याने या निवडणुकीत पक्षाकडे की प्रश्‍नांकडे बघून मतदान होणार, हे निकालनंतरच स्पष्ट होईल. बापटानंतर मतदारसंघाचा वारसा कोणाकडे जाणार, हादेखील चर्चेचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT