Yuti-Aghadi
Yuti-Aghadi 
पुणे

Vidhan Sabha 2019 : उमेदवारांनी साधले सुटीचे औचित्य

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पिंपरी - विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते राज्यभर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत असताना शहरातील उमेदवारांनी पदयात्रा आणि वैयक्‍तिक गाठीभेटी घेत रविवारच्या सुटीचे औचित्य साधत मतदारांशी थेट संपर्क साधला. 

दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे सकाळच्या वेळेत उद्यानांत फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या गाठीभेटी घेत उमेदवारांनी संवाद साधला. 

रविवारच्या सुटीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती, त्याचाही फायदा घेत काही उमेदवारांनी या परिसरात फेरफटका मारत प्रचार केला. अनेक उमेदवारांनी विविध भागांमध्ये कोपरासभांचे आयोजन केले होते. त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र शहरातील विविध भागांमध्ये पाहायला मिळाले. 

युती आणि आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रांवर सर्वाधिक भर दिला आहे. शहरातील गृहरचना सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देत उमेदवारांनी इथल्या रहिवाशांबरोबर चर्चा केली. 

अवघ्या सहा दिवसांचा अवधी उमेदवारांच्या हातात राहिला आहे, त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या रिक्षा शहरात फिरू लागल्या आहेत.  

उरलेल्या सहा दिवसांत शहरात नेतेमंडळींच्या सभांचा जोर वाढणार आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेतेमंडळींचा आता शहरात सभांवर भर असणार असून, काही ठिकाणी रोड शोचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT