Sharad Pawar Amol Kolhe esakal
पुणे

MP Amol Kolhe : विधानसभा निवडणुकीत 180 ते 190 जागा महाविकास आघाडी जिंकणार; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती.

सुदाम बिडकर

''आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे नियोजन केले असून त्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.''

पारगाव : लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. नेते कोणत्याही दिशेला असले, तरी सर्वसामान्य जनता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी होती. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेवरून ज्या मायबाप जनतेने साथ दिली, त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे होते. त्या हेतूने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी दिली.

आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघाचा आज (बुधवार) मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब बाणखेले, सुरेखा निघोट, पूजा वळसे पाटील, धोंडिभाऊ भोर, संजय बढेकर, विशाल वाबळे, दत्ता गांजाळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे म्हणाले, आजच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनता दरबार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना नेत्याशिवाय अथवा शिफारशीशिवाय थेट प्रशासनापर्यंत पोहचण्याचा दुवा होता. ज्या जनतेने प्रेम दिले, विश्वास दिला. विपरीत परिस्थितीत ठामपणे पाठिशी उभी राहिली, त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले होते, असे कोल्हेंनी सांगितले.

MP Amol Kolhe

ते पुढे म्हणाले, महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलीस यासंदर्भात अनेक समस्या समोर आल्या आहेत. संबंधित विभागांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली, यावर काय कार्यवाही केली या संदर्भात सात दिवसात अहवाल मागितला आहे. माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच शेतकऱ्यांच्या दुधाला, शेतीमालाला चांगला दर दिला तर चांगले होईल. माझी लाडकी बहीण योजना चालू राहण्याची जबाबदारी युती सरकारने घेतलेली नाही. केवळ तीन महिन्याचे पैसे मिळतील पुढे काय होईल, याबाबत माहित नाही, असे त्यांनी सांगितले.

इतर पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, मात्र इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का घ्यायचे हा प्रश्न आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करणार नाही, असे सांगून विधानसभा निवडणुकीत 180 ते 190 जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा त्यांनी केला. आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून आज जनता दरबारास आम्ही सर्व एकत्र आलो असून पुढील आमदार हा महाविकास आघाडीचा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे नियोजन केले असून त्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT