Mahavitaran-Society
Mahavitaran-Society 
पुणे

महावितरणच्या कर्मचारी वसाहतीची दुर्दशा (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे, बिजलीनगरमधील महावितरण कर्मचारी वसाहतीची. किंबहुना, संपूर्ण वसाहतीचीच अशी दुरवस्था झाली आहे. या वसाहतींच्या देखभालीसाठी लाखो रुपयांची तरतूद असतानाही वसाहतीच्या या अवस्थेबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बिजलीनगरमध्ये महावितरण कर्मचारी वसाहती आहेत. तेथे राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे रक्कम कपात केली जाते. तुलनेने कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. भोसरी-गवळी माथा महावितरण वसाहतींमध्येही असेच चित्र असल्याचे बोलले जात आहे. 

इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
या इमारती १९६९ मध्ये बांधल्या आहेत. बिजलीनगर कर्मचारी वसाहतीतील पाच इमारतीत ‘वन रूम किचन’ आणि ‘वन बीएचके’ अशा ६० सदनिका आहेत. या इमारतींमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी, लिपिक, लाइनमन, तज्ज्ञ तसेच इतर कर्मचारी राहतात. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्याची आवश्‍यकता आहे. 

समस्या कायमच
अनेक इमारतींचे स्लॅब तुटले आहेत. शौचालय, बेसिन, नळ, फरशा, खिडक्‍यांच्या काचा व भिंतींना तडे गेले आहेत. सांडपाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. इमारतींमधील स्वच्छतागृहांमधील पाण्याची गळती सुरू आहे. स्थापत्य विभागाचे कर्मचारी अधूनमधून येथे येत असले, तरी प्रश्न आजही कायम आहेत. पाणी पुरवठाही अपुरा होत आहे. 

डेंगीचे रुग्ण
या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याची तक्रार रहिवाशांची आहे. इमारतीच्या भिंतींवर झाडे उगविली आहेत. इमारतींना चारही बाजूंनी उंदीर व घुशींची बिळे आहेत. वसाहतीच्या आजूबाजूला गवत, राडारोडा पडलेला आहे. शिवाय वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसर अतिशय अस्वच्छ झाला आहे. परिणामी, वसाहतीमधील रहिवाशांना डेंगीची लागण होऊ लागली आहे. 

महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या केबिनच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वसाहतींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कर्मचारी असुरक्षित जीवन जगत आहेत.
- संतोष सौंदणकर, जिल्हा सदस्य, विद्युत संनियंत्रण समिती

दुरुस्ती कामांसाठी लवकरच नवीन कामाचे आदेश मिळणार आहेत. त्यानंतर सबडिव्हिजनच्या माध्यमातून कामे पूर्ण केली जातील. 
- एस. ए. नेहेते, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महावितरण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT