Corona Vaccine
Corona Vaccine 
पुणे

एका लशीचा आँखो देखा हाल...

महेश बर्दापूरकर

भारताच्या, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लशीला अखेर मान्यता मिळाली असून, लवकरच भारतीयांना तिचे डोस दिले जातील. कोरोनानं ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात भारतीयांना पळता भुई थोडी केली होती आणि त्यावरचा अक्सर इलाज आल्याशिवाय आपली सुटका नाही, असं प्रत्येकाचंच मत बनलं होतं. सीरम इन्स्टिट्यूटचा कार्यकारी संचालक (संशोधन आणि विकास) डॉ. उमेश शाळिग्राम हा माझा बालमित्र आणि माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं तो अगदी तत्परतेनं उत्तर देतो. कोरोना लशीवरही मी त्याला अनेकदा व्हॉट्सॲप मेसेज करून माझे प्रश्‍न विचारत होतो आणि दिवसाचे चोवीस तास काम करणारा हा माझा मित्र वेळ मिळेल तेव्हा ऑडिओ मेसेज पाठवून उत्तर देत होता. लशीची स्थिती काय आहे, तिला आणखी कोणते पर्याय आहेत, मंजुरीची प्रक्रिया कोठपर्यंत आली आहे याची उत्तरं मला मिळत होती, मात्र ती न छापण्याच्या अटीवरच. सीरम लशीबाबत अत्यंत गुप्तता पाळून होती...

कोविशिल्डच्या सर्व फेजच्या चाचण्या पूर्ण झाल्या आणि ती मंजुरीसाठी पाठविण्यात आल्यावर डॉ. उमेशनं अधिक माहिती देण्यास सुरुवात केली. ‘सकाळ’च्या पत्रकारांशी काही अटींवर बोलण्यासाठी तयारही झाला. या भेटीत त्यानं संशोधनातील टप्प्यांची, लशीच्या उपयुक्ततेची, निर्मिती प्रक्रियेची माहिती दिलीच होती. मात्र, ही व्यवस्था नक्की कशी काम करते, लसनिर्मिती नक्की कशी होते, त्यातील प्रक्रिया काय असतात हे पाहण्याची माझी उत्सुकता कायम होती. पुढील काही दिवसांतच त्यानं मला सीरममध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसर आणि मांजरी या दोन भागांत पसरलेल्या या संशोधन संस्थेत अनेक इमारती आहेत व महाकाय, रोबोटिक तंत्रावर चालणाऱ्या प्रयोगशाळांत मलेरिया, स्वाइन फ्लूपासून कोविशिल्डपर्यंतच्या लशींवरचं संशोधन आणि निर्मिती प्रक्रिया चोवीस तास सुरू असते. कोरोनावरील लशीचं मूळ द्रावण, त्याला डायल्यूट करण्याची प्रक्रिया, त्यानंतर मोठ्या मशिनवर ते चढविल्यानंतर ते रोबोटिक हाताच्या मदतीनं बाटल्यांत भरण्याची प्रक्रिया, बाटल्या निर्जंतुक करण्याची प्रक्रिया, २४ कॅमेऱ्यांच्या मदतीनं भरलेल्या बाटल्यांमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का, हे पाहण्यासाठीची दर्जा तपासणी व शेवटी या बाटल्यांचे पॅकिंग अशी मोठी प्रक्रिया तिथं चोवीस तास सुरूच होती. तयार झालेल्या बाटल्या महाकाय कोल्ड स्टोअरेजमध्ये साठविल्या जात होत्या.

या पूर्णपणे निर्जंतुक केलेल्या लॅबमध्ये पीपीई किट घालून जावं लागत होतं आणि एका लॅबमधून दुसरीत जाताना पहिली किट काढून दुसरी परिधान करावी लागत होती. अशा आठ ते दहा ठिकाणी चाललेल्या प्रक्रिया, त्यामागील विज्ञान, प्रक्रियेमध्ये कोणताही दोष राहू नये म्हणून झटणाऱ्या संशोधक व तंत्रज्ञांचे कष्ट आणि निर्धार केवळ अवर्णनीय होता. मानव प्रजातीला एका धोक्यापासून वाचवण्याच्या त्यांचा प्रयत्न निर्धारानं सुरू होता...या सर्वांबद्दल व केवळ कौतुक आणि अभिमान वाटत होता. 

...अन्‌ मला भरून आलं
क्वालिटी चेकमधून बाहेर पडलेल्या बाटल्यांपैकी एक हातात घेऊन पाहताना मला अगदी भरून आलं होतं. ही लस भारतीयांसह जगातील अनेक लोकांची कोरोना नावाच्या राक्षसाच्या भीतीपासून मुक्तता करणार होती... परतीच्या प्रवासात मी डॉ. उमेशचं कौतुक करीत होतो, तर तो ब्रिटनमधील संशोधकांशी लशीच्या तांत्रिक बाबी व परवानग्यांसंदर्भात चर्चेत व्यग्र होता. घर जवळ आल्यावर डॉ. उमेशनं त्याच्या ड्रायव्हरला मला माझ्या ऑफिसमध्ये सोडायला सांगितलं आणि स्वतः गाडीतून उतरून पायीच आपल्या घराकडं निघाला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT