पुणे

परीक्षा देऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांचा हल्ला ; सांगोला तालुक्यातील वाकी येथील घटना , शेकडो विद्यार्थी जखमी

CD

MHD26B05108, MHD26B05109
महूद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. (दुसऱ्या छायाचित्रात) उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले विद्यार्थी.

परीक्षा केंद्राबाहेर मधमाशांचा हल्ला; सत्तर विद्यार्थी जखमी

वाकी शिवणे येथील घटना; शिक्षक, नागरिकांनाही मधमाशांचा चावा


महूद, ता. ९ : दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केला. यात शेकडो विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) दुपारी सव्वा एकच्या सुमारास वाकी (ता. सांगोला) येथे घडली. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करून त्यांना सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले.
सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे येथील विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर वाकी, खवासपूर, आचकदाणी, लक्ष्मीनगर तसेच महूद येथील आदर्श इंद्रजीत विद्यालयासह विविध शाळांमधील सुमारे साडेतीनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सोमवारी भूमिती विषयाचा पेपर दुपारी १.१० वाजता संपला. त्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडत असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला चढविला.

परीक्षा केंद्रासमोरून विजयनगर–पुणे राष्ट्रीय महामार्ग जात असून, महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका झाडावर आग्या मोहोळ होते. अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे झाडाची फांदी हलल्याने मोहोळ अस्वस्थ झाले आणि मधमाशा मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. त्याचवेळी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांजवळ विद्यार्थी जमा झाले होते. सुरुवातीला मधमाशांनी वाहनचालक अस्लम मुलाणी यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर परीक्षा केंद्र परिसर, उभ्या असलेल्या वाहनांमधील विद्यार्थी तसेच महामार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांवरही मधमाशांनी हल्ला चढविला.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली. अनेक विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. काही विद्यार्थ्यांनी पुन्हा वर्गखोल्यांमध्ये जाऊन आश्रय घेतला. मात्र उघड्या वाहनांत बसलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यावर मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावे घेतले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने महूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयातील सुमारे ३५ विद्यार्थी व शिक्षकांवर येथे उपचार करण्यात आले, तर आचकदाणी हायस्कूलच्या सुमारे २० जखमी विद्यार्थ्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले.

चौकट
वाहनचालकास श्‍वास घेण्यास त्रास
दरम्यान, सर्वप्रथम हल्ला झालेल्या वाहनचालक अस्लम मुलाणी यांनी स्वतः जखमी असूनही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महूद येथील आदर्श विद्यालयापर्यंत पोचविले. नंतर श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना महूद येथे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काही काळ गोंधळाची स्थिती
मधमाशांच्या हल्ल्यामुळे परीक्षा केंद्र परिसर आणि राष्ट्रीय महामार्गावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पळापळीमध्ये काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि प्रवेशपत्रेही हरविल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही समाजकंटकांनी दगड मारल्यामुळे मोहोळ उठल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT