Major changes in Pune District Rural Police Force baramati  esakal
पुणे

Pune News : पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल…

सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारून पोलीस अधीक्षकांना कळवावे असे आदेश

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्हा पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल केले असून विविध अधिकाऱ्यांना नवीन जागी नियुक्ती देण्यात आली आहे. दोन वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यामुळे तसेच प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन पोलीस ठाण्यामध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे -संजय शंकर जगताप- कामशेत ते शिरूर, अण्णासाहेब बाळासाहेब घोलप- सासवड ते राजगड, उमेश तावस्कर -जेजुरी ते नियंत्रण कक्ष, महेश कृष्णाराव ढवाण -पोलीस कल्याण शाखा ते रांजणगाव,

बळवंत कुंडलिक मांडगे -रांजणगाव ते मंचर, सचिन दिनकर पाटील- राजगड ते नियंत्रण कक्ष, विलास शामराव भोसले - वडगाव मावळ ते सुरक्षा शाखा, सतीश भाऊसाहेब होळकर- मंचर ते आर्थिक गुन्हे शाखा, संतोष शामराव जाधव- सुरक्षा शाखा ते सासवड, बापूसाहेब पोपट सांडभोर- जिल्हा वाहतूक शाखा ते जेजुरी.

दरम्यान पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलामध्ये नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. बबन शंकर पठारे -नियंत्रण कक्ष, अण्णा मन्या पवार -आर्थिक गुन्हे शाखा, ललित भगवान वरटिकर- नियंत्रण कक्ष,

रवींद्र दत्तात्रय पाटील-कामशेत, कुमार रामचंद्र कदम -वडगाव मावळ, दिनेश सखाराम तायडे- बारामती शहर, सुभाष सदाशिव चव्हाण- नियंत्रण कक्ष, राजेश गणेश गवळी- पोलीस कल्याण शाखा, सूर्यकांत देवराव कोकणे- नियंत्रण कक्ष, सुहास लक्ष्मण जगताप- जिल्हा वाहतूक शाखा, शंकर मनोहर पाटील- भोर पोलीस ठाणे. वरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारून पोलीस अधीक्षकांना कळवावे असे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT