Make a career in designing after 12th grade.png 
पुणे

बारावीनंतर करा डिझायनिंग क्षेत्रात करिअर; 'या' आहेत संधी

सकाळवृत्तसेवा

जगभरात डिझायनिंग या क्षेत्राला प्रचंड मागणी आणि वाव आहे. त्या मानाने भारतात अजून हे क्षेत्र लहान आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र भरारी घेऊ लागले आहे. डिझायनिंग ही एक कला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, अशा तरुण-तरुणींना या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. कोणत्या आहेत, त्या संधी जाणून घ्या या लेखातून...

प्रॉडक्ट डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग इ. विषयात या शाखेतून स्पेशलायझेशन करता येते. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. कोणत्याही शाखेतून बारावी नंतर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी राष्ट्रीयस्तराकडे नावाजलेल्या दोन संस्थांची माहिती घेऊयात.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद) ः
ही संस्था जागतिक स्तरावर नावाजलेली आहे. या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर, असे दोन्हीही कोर्सेस चालवले जातात. बारावीनंतर चार वर्षांचा ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाईन’ नावाचा कोर्स येथे उपलब्ध आहे.

फक्त साठ जागा असणार्‍या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये फाउंडेशन कोर्स दिला जातो. यामध्ये ज्यांच्यातील डिझाईन कौशल्यक्षमता विकसित केल्या जातात. त्यानंतर तीन प्रकारच्या विशेष शाखांमध्ये म्हणजे इंडस्ट्रियल डिझाईन (प्रॉडक्ट डिझाईन, इंटेरिअर डिझाईन) कम्युनिकेशन डिझाईन (ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, एक्झिबिशन) आणि टेक्सटाईल डिझाईनिंग त्यांना प्रावीण्य मिळवता येते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ः
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था काम करते. शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत संस्था जागतिक स्तरावर नावाजलेली आहे. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कोलकता येथे शाखा आहेत.
बारावीनंतर चार वर्षांचा पदवी कोर्स येथे चालवला जातो. यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
बारावी नंतरचे कोर्सेस : 

- फॅशन डिझायनिंग ः
बारावीला बसणार्‍या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यासाठी घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षेत दोन तासांचा जनरल अ‍ॅप्टिट्यूड पेपर असतो. ज्यात गणितीय क्षमता, संख्यात्मक क्षमता, कम्युनिकेशन क्षमता, इंग्रजी यांची चाचणी होते. त्याचबरोबर तीन तासांची कलात्मक सृजन क्षमता चाचणी (क्रिएटिव्ह अ‍ॅिलिटी) द्यावी लागते.

- फॅशन टेक्नॉलॉजी :
बारावीला बसणार्‍या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर्षांचा अ‍ॅपरेल प्रॉडक्शनचा अभ्यासक्रम आहे. यालाही दोन तासांचा जनरल अ‍ॅप्टिट्यूड पेपर द्यावा लागतो. त्यानंतर तीन तासांची व्यवस्थापकीय क्षमता चाचणी द्यावी लागते. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत.

- आयआयटी पवई : 
आयआयटी पवई येथे 4 वर्षांचा बॅचलर ऑफ डिझायनिंग नावाचा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, इंटरॅक्शन डिझायनिक, अ‍ॅनिमेशन अँड मोबिलीटी अँड व्हेईकल डिझायनिंग या विषयातील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी एक स्वतंत्र सीईटी आयआयटी पवईतर्फे घेतली जाते. डिझाईन आणि टेक्नॉलॉजीमधील या जगविख्यात संस्थांखेरीज भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहेत. नावीन्याची आवड आणि क्रिएटिव्हिटी असणार्‍या तरुण-तरुणींसाठी एक आश्‍वासक करिअर म्हणून फॅशन डिझायनिंगकडे नक्कीच बघता येईल.

करा डिझायनिंगमध्ये करिअर : 
संगणक युगात डिझाइन क्षेत्रात अनिमेशन, व्हीएफएक्स, वेब डिझाइन, ग्राफिक्स यासारख्या करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. तुमच्या योजना आणि कल्पना सादर करण्यासाठी या सृजनशील तंत्रज्ञानाचा वापर होत असतो. वेगवेगळ्या उद्योग जगताची सादरीकरण ही अत्यंत महत्त्वाची गरज असताना जगाच्या पाठीवर आउटसोर्सिंगच्या रूपाने जगभरातून अशा प्रकारची कामे भारतात होत असतात. सर्वाधिक खात्रीशीर करिअरच्या संधी अनिमेशन, व्हीएफएक्स, इंटेरिअर डिझाइन, वेब डिझाइन, ग्राफिक्स यासारख्या क्षेत्रात निर्माण होत आहेत. 

बारावीनंतर विद्यार्थ्यांना अनिमेशन आणि इंटेरिअर डिझाइनच्या विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त पदवीसाठी प्रवेश घेता येइल. यासाठी आर्टस, कॉमर्स, सायन्स यापैकी कोणत्याही शाखेची अथवा कोणतीही बारावी समक्ष पात्रता चालू शकते. दहावीनंतरदेखील विद्यार्थी या क्षेत्रातील करिअरसाठी डिप्लोमा इन अनिमेशन या अभ्यासक्रमाचा पर्याय निवडू शकतात. महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परीक्षा मंडळाची या अभ्यासक्रमाला मान्यता आहे. हा डिप्लोमा अकरावी आणि बारावी समकक्ष मानला गेला असून, यानंतर विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, इंटेरिअर डिझाइन, वे डिझाइन, ग्राफिक्स या क्षेत्रातील अभ्यासक्रमदेखील उपलब्ध असतात. पुण्यातील काही खासगी संस्थामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अडोबे आणि आटोडेस्क या सोफटवेअरच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षांना निशुल्क बसविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT