‘‘हरी नारायण आपटे, नामदेव ढसाळ, ते आताचे किरण येले यांच्यासारखे निवडक पुरुष लेखक स्त्रियांबद्दल सामर्थ्याने बोलतात. मात्र त्याव्यतिरिक्त पुरुष लेखक स्त्रियांचे मर्यादित रूपातीलच चित्रण करतात. लेखकाला आई, बहीण, मुलीचे दु:ख तरी दिसायला हवे,’’ असे मत लेखिका शिल्पा कांबळे यांनी व्यक्त केले. ऋचा मुळे यांनी कांबळे व लेखिका ऐश्वर्या रेवडकर यांच्याशी संवाद साधला.
लेखनप्रक्रियेविषयी कांबळे म्हणाल्या, ‘‘मी जे जगणे अनुभवते ते कथांतून येते. लिहिण्यातून नफा मिळत नाही. माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांना मी लेखिका आहे हे माहितीदेखील नसते. समाजातील खूप कमी लोक वाचतात. लेखिका म्हणून प्रथम प्रश्न पडतात, ते पाठलाग करतात आणि त्यांची कथा, नाटक असे काही तरी होते. आतमध्ये खूप राग असतो आणि त्या रागाचे उत्तर अक्षरांमध्ये दिसते.’’ ‘छत्तीसगडच्या स्त्रियांना व माझ्या आईला पाहून माझ्यात धाडस आले,’ असे रेवडकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
आपण समाजात वावरताना मुखवटे घालतो. परंतु मी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे व रुग्ण म्हणून समोर आलेल्या व्यक्तीचे मात्र सर्व मुखवटे उतरलेले असतात. मूल न होणाऱ्या, गर्भपातासाठी आलेल्या किंवा विधवा स्त्रियांचे प्रश्न बघताना असे जाणवले की स्त्रियांच्या मनावर गर्भाशयाचे मोठे ओझे असते. स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या विविध पदरांचे प्रतिबिंब मला साहित्यात दिसत नाही.
- शिल्पा कांबळे, लेखिका
राजन गवस, जयंत पवार अशा पुरुष लेखकांनी स्त्रियांची तडफड उत्तमरीतीने मांडली आहे. परंतु अपवाद वगळता हल्ली असा ट्रेंड आहे, की पुरुष स्त्रियांच्या भावना लिहितात व त्यांना पुरस्कार मिळतात. अशा वेळी वाटते, की गर्भाशय असलेल्या लेखिका लिहिताहेत त्यांची पुस्तके छापा व वाचा! पुरुषांनी त्यांच्या मनातील असुरक्षिततेविषयी जरूर लिहायला हवे; पण तसे होत नाही.
- ऐश्वर्या रेवडकर लेखिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.