पुणे

''माळेगाव''च्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे

CD

माळेगाव, ता. ९ : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची रविवारी (ता. ९) बिनविरोध निवड झाली.
दिवंगत उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील, असे जाहीर केले होते. त्यानुसार संगिता बाळासाहेब कोकरे यांनी मुदत पूर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत नितीन शेंडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने शेंडे यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. या निवडीसाठी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, दत्तात्रेय येळे, गणपत खलाटे, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, विशाल जगताप, प्रताप आटोळे, रतनकुमार भोसले, शेखर जगताप तसेच कार्यकारी संचालक पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, माळेगाव कारखान्याने आगामी काळात सुमारे ७५ कोटी रुपये खर्चाचा सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच आगामी गळीत हंगामात १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या आर्थिक व औद्योगिक वाटचालीला गती देण्याची जबाबदारी नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन शेंडे यांच्यासह संचालक मंडळावर राहणार आहे.

माजी तालुकाध्यक्षांना पुन्हा संधी
नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी सांभाळली आहे. तसेच २००२ मध्ये त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या शेंडे यांच्यावर आता उपाध्यक्षपदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT