mal2
mal2 
पुणे

"माळेगाव' जपणार उच्चांकी ऊसदराची परंपरा!

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांची ग्वाही;  गाळप हंगामास सुरुवात

माळेगाव (पुणे) : "माळेगाव साखर कारखान्याने विस्तारीकरण करून सभासदांना गेली चार वर्षांत राज्यात विक्रमी ऊसदर दिला. सभासदांची सहकारातून समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला. हा संदेश सहकाराला बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे "माळेगाव' सर्वाधिक ऊसदराची परंपरा यंदाच्या हंगामातही कायम राहील,'' असे आश्‍वासन भाजपचे नेते तथा ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी दिले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाला. त्या वेळी आयोजित सभेत तावरे बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, उपाध्यक्ष चिंतामणी नवले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक शिवाजीराव देशमुख, डॉ. आर. एन. पाठक, जिल्हा बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते, डिस्टिलरीचे अध्यक्ष प्रमोद गावडे, संचालक एस. एन. जगताप, अशोक सस्ते, सुनील सातव, अविनाश देवकाते, शशिकांत कोकरे, अशा देवकाते, सुरेश खलाटे, स्वरूप वाघमोडे, संगीता कोकरे, विजय वाबळे आदींसह सभासद उपस्थित होते.

चंद्रराव तावरे म्हणाले, ""माळेगावने हंगामात प्रतिदिनी साडेआठ हजार टन, तर एकूण 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. गाळप प्रक्रियेत सुरवातीला 15-7 तारखेला नोंदविलेला सव्वा दोन लाख टन ऊस 100 टक्के गाळण्याचे धोरण आहे. उत्पादन खर्च कमी करून साखर उताऱ्यात वाढ करणे, साखर पेप्सी, कोकाकोला आदी कंपन्यांना विक्री करण्याचा मानस आहे. वीज व इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवून सभासदांना विक्रमी दर देण्याचा प्रयत्न असणार आहे.''

"माळेगाव'चे विस्तारीकरण वेळेत व दर्जेदार केल्याबद्दल विविध कंपन्यांचा सन्मान रंजन तावरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात बॉयलिंग हाउसचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल मॉडर्न इंजिनिअरिंग वर्क्‍सचे संतोष रणसिंग, विनोद रणसिंग (रा. निमसाखर) यांचा समावेश होता. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

"शेजारी कारखान्यांपेक्षा 92 कोटी अधिक दिले'
अध्यक्ष रंजन तावरे यांनी चार वर्षांतील कामकाजाचा आढावा मांडला. त्यात माळेगाव
कारखान्याने गेली चार वर्षांत सभासदांना सोमेश्‍वर व छत्रपती कारखान्याच्या तुलनेत 92 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम दिली. कारखाना विस्तारीकरणासाठी पावणेदोनशे कोटींपैकी केवळ 83 कोटीचे कर्ज, विस्तारीकरणामुळे गाळपक्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन, गोदाम उभारणे, सहवीजनिर्मितीची क्षमता 21 वरून 35 मेगावॉटपर्यंत वाढविणे, डिस्टिलरी व शेततळी नव्याने उभारणे, ऑनलाइन खरेदी, कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविल्याचे तावरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT