माळीनगर येथे १३५ जणांचे रक्तदान
.........
माळीनगर : श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज, श्री क्षेत्र नानीजधाम यांच्या प्रेणेने येथे आयोजित शिबिरात १३५ जणांनी रक्तदान केले.
माळशिरस सेवा समिती आयोजित माळीनगर सेवा केंद्र व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबिर पार पडले. आबासाहेब शिंदे, समाधान माने, आकाश भिसे, सचिन एकतपुरे, किशोर एकतपुरे, अंजली शिंदे, मनिषा मोहिते, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.