पुणे

मलठण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक नवनाथ वाव्हळ

CD

कवठे येमाई, ता. ४ : मलठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उद्योजक नवनाथ महादू वाव्हळ, तर उपाध्यक्षपदी दीपाली विशाल दंडवते यांची एकमताने निवड करण्यात आली. सागर दंडवते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पालक व समिती सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवनाथ वाव्हळ यांनी शाळेच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करणे, विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे तसेच पालक-शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्यावर भर देणार असून मागील दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शाळेतील विकासकामांना सर्वांच्या सहकार्याने आणखी गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मलठण येथील जिल्हा परिषद शाळा ही एक ‘आदर्श शाळा’ बनविण्याची खूणगाठ मनाशी बांधली असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्षा दीपाली दंडवते यांनीही विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत समिती सदस्यांच्या सहकार्याने सकारात्मक आणि विधायक काम करण्याची ग्वाही दिली.
निवडीनंतर सरपंच माधुरी थोरात, माजी सरपंच शशिकांत वाव्हळ, उद्योजक सागर दंडवते, माजी उपसरपंच रामचंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, संदीप गायकवाड, विनोद कदम, सुदाम गायकवाड, नानासाहेब फुलसुंदर, केंद्र प्रमुख शांताराम पवार, मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

४० दिवसांपासून कांदा ७ ते १० रुपये किलो कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० अनुदानाची मागणी; सोलापूर ‘एपीएमसी’त १४९२८ ट्रक कांदा विकून शेतकऱ्यांना मिळाले अवघे ११८ कोटी

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Nandurbar News : काठीच्या राजवडी होळीचे होणार जागतिक ब्रँडिंग; आदिवासी विकास मंत्र्यांनी धडगावच्या भोंगऱ्या बाजारात धरला ठेका!

SCROLL FOR NEXT