पुणे

हुमगाव : मानकुमरे यांचे आरोप आत्मप्रौढी आणि चुकीचे; शासकीय विश्रामगृहातील वादावर श्रीहरी गोळे यांचा गौप्यस्फोट

CD


मानकुमरे यांचे आरोप बिनबुडाचे

श्रीहरी गोळे; फरफटीचा प्रकार घडला नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण

हुमगाव, ता. १४ : हातगेघर सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणताही फरफटीचा प्रकार घडलेला नाही. मानकुमरे यांनी आत्मकेंद्रित राजकारणासाठी चुकीची माहिती दिली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे माजी जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी पत्रकाद्वारे आपली बाजू मांडत मानकुमरे यांच्या राजकारणाचा समाचार घेतला आहे.
गोळे यांनी पत्रकात म्‍हटले आहे, की भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे ‘सेवा अभियान’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री विक्रम पावसकर, आमदार धैर्यशील कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागर प्रतिष्ठान आणि भाजप उद्योजक आघाडीचे माजी अध्यक्ष दीपक गावडे निवेदने देत असताना, वसंतराव मानकुमरे यांनी तिथे येत साखरे यांना निवेदने न स्वीकारण्याची विनंती केली, तसेच हातगेघर सोसायटीत विरोध केल्याचा आक्षेप घेत मानकुमरे यांनी थेट अंगावर धावून येत धमकी दिल्याचा दावा गोळे यांनी केला आहे.
​याप्रसंगी मानकुमरे यांना उत्तर देताना गोळे म्हणाले, की सहा गाव पंचक्रोशीतील सोसायटी सदस्यांना विश्वासात न घेतल्यामुळेच त्यांना सूचक आणि अनुमोदक मिळाला नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी सामंजस्याने बैठक घेऊन मतभेद मिटवण्याच्या सूचना दिल्या असतानाही मानकुमरे यांनी एकाधिकारशाही करत दमदाटीचा मार्ग अवलंबला, तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी छुपी युती करून भाजपच्या जागा पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा गंभीर आरोपही गोळे यांनी या वेळी केला. दोन्ही बाजूंच्या शाब्दिक चकमकीनंतर संघटनमंत्री विक्रम पावसकर यांनी हस्तक्षेप करत भाजप हा शिस्तीचा पक्ष असून, सर्वांनी पक्षाची शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर मानकुमरे अपशब्द वापरत तिथून निघून गेल्याचे गोळे यांनी नमूद केले आहे.
​हातगेघर आणि सहा गाव पंचक्रोशीतील सदस्यांनी सोसायटी निवडणुकीवर बहिष्कार टाकून मानकुमरे यांची दडपशाही उखडून लावली आहे. संभाव्य जावळी-महाबळेश्वर मतदारसंघाच्या फेररचनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मानकुमरे हे तालुक्यातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्षापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव आखत आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रवृत्तींना वेळीच वेसण घालावी आणि पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी आग्रही विनंती श्रीहरी गोळे यांनी भाजप वरिष्ठांकडे पत्रकाद्वारे केली आहे.

.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT