Manchar and Moose Wala murder accused Santosh Jadhav arrested sakal
पुणे

मंचर व मूसेवाला हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

संतोष जाधव सह एकाला गुजरात मध्ये अटक: पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

डी.के वळसे पाटील

मंचर : येथील ओकार उर्फ राण्या बाणखेले व पंजाब राज्यातील गायक सिद्धू मूसे वाला या दोन हत्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून सराईत गुन्हेगार संतोष सुनील जाधव (वय 20 रा पोखरी तालुका आंबेगाव सध्या मंचर) याला रविवारी रात्री अटक केली आहे या गुन्हेगारांला आश्रय दिल्याच्या आरोपावरून नवनाथ सुरेश सुर्यवंशी ( वय 28 रा विखळे ता. खटाव जि सातारा सध्या रा कच्छ ता मांडवी जि भुज ) यालाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी ही कारवाई रविवारी संध्याकाळी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर .या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पुणे मोका न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते सोमवार (ता.२०) पर्यंत दोन्हीआरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉअभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यातच गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह तीन पोलीस पदथके बाणखेले हत्येतील आरोपींच्या शोधासाठी कार्यरत होती.

दरम्यान गेल्या आठवड्यात जाधवला आश्रय दिल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ, (रा. नारायणगाव ता जुन्नर) याला अटक केली त्यामुळे राण्या बाणखेले हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. जाधव सतत पोलीस यंत्रणांना गुंगारा देत होता. पण पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणेने जाधवचा छडा लावल्यामुळे पंजाब राजस्थान व नवी दिल्ली च्या पोलिसांनाही दिलासा मिळाला आहे.

मंचर पोलीस ठाणेकार्य क्षेत्रात एकलहरे फकीर वाडी परिसरात राण्या बाणखेले याची हत्या दिड वर्षापूर्वी भरदिवसा गोळ्या घालून करण्यात आली होती. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 459/2021 भादवि 302, १२०, (ब) 34, 212 आर्म अँक्ट 3 (25) (27) mcoc 3 (i) (ii) 3 (2) 3 (3) (४) असे गुन्हे दाखल आहेत. फरारी आरोपी संतोष जाधव यास आश्रय देवुन लपवुन ठेवण्यास मदत केल्या बद्दल सुर्यवंशी यास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीमुळे मूसेवाला हत्येप्रकरणी तपासाला गती प्राप्त होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व पोलीस यंत्रणेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT