Manchar Nagarpanchayat
Manchar Nagarpanchayat sakal
पुणे

मंचर नगरपंचायत १७ जागांच्या आरक्षण सोडतीत नऊ जागी महिलाराज

डी के वळसे पाटील

मंचर - प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. एकूण १७ जागांच्या आरक्षण सोडतीत आठ जागा सर्वसाधारण महिला व एक अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. सात जागा सर्वसाधारण व एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. महिलाराज आल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज इच्छुकांचे मनसुबे उधळल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

मंचर नगरपंचायतीच्या मुख्यालयात सोमवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या उपजिल्हा अधिकारी मनीषा आखाडे, नगरपंचायत मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी चिट्ठीद्वारे सोडत काढल्या. त्यानुसार मंचर नगरपंचायत आरक्षण : १, ४, ५, ६, ८, ९, १३, १५ हे वार्ड सर्वसाधारण महिलांसाठी, वार्ड क्रमांक ३ अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. वार्ड क्रमांक २, १०, ११, १२, १४, १६, १७ हे सर्वसाधारणसाठी आहेत. वार्ड क्रमांक ७ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अँड. अविनाश रहाणे, लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, माजी सरपंच दत्ता गांजाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुहास बाणखेले, लक्षमण थोरात भक्ते, प्रवीण मोरडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले , भाऊसाहेब निघोट, स्वप्निल बेंडे पाटील, गणेश खानदेशे ,बाजीराव मोरडे, विकास बाणखेले, भाजपचे सुशांत थोरात, संदीप बाणखेले, गणेश बाणखेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

“अनेक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांचे स्वप्नांवर पाणी पडले आहे. तर महिलाराज मध्ये माजी सरपंच मीरा बाणखेले, संगीता बाणखेले, माणिक गावडे, आशादेवी राजाराम बाणखेले,राजश्री गांजाळे, पल्लवी लक्ष्मण थोरात, मोनिका सुनील बाणखेले, अश्विनी शेटे यांची लॉटरी लागली आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT