पुणे

मंद्रूपच्या राजकारणात मोठा भूकंप; उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर!

CD

मंद्रूपच्या उपसरपंचांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर
१४ विरुद्ध ४ मतांनी भगवान व्हनमाने यांना पदावरून पायउतार

सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. १३ : मंद्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधातील अविश्वास ठराव शुक्रवारी (ता. १३) झालेल्या विशेष सभेत १४ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला. त्यामुळे व्हनमाने यांना पद सोडावे लागले आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यास एक वर्ष शिल्लक असताना झालेल्या या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नव्या उपसरपंचपदी कोणाची निवड होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उपसरपंच व्हनमाने यांच्याविरोधात १४ सदस्यांनी एकत्र येत ९ नोव्हेंबरला दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केला होता. त्यानुसार शुक्रवारी मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. तहसीलदार जमदाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत ठरावावर चर्चा करून मतदान घेण्यात आले. त्यात ठरावाच्या बाजूने १४, तर विरोधात चार मते पडली. त्यामुळे ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यास एक वर्ष शिल्लक असताना अविश्वास ठराव मंजूर झाल्याने गावातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अंतर्गत गटबाजी आणि आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही खेळी झाल्याची चर्चा आहे. या घडामोडीला जातीय समीकरणांचीही किनार असल्याचे बोलले जात आहे.
----------------------------
नव्या उपसरपंचासाठी मोर्चेबांधणी
अविश्वास ठराव मंजूर झाल्याने उपसरपंचपद रिक्त झाले आहे. या पदावर कोणाची निवड होणार, याबाबत गावात उत्सुकता असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT